Goa Escort Service Fraud: "गोव्यात दलालांची दादागिरी चालणार नाही!" मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत कडक इशारा; 512 संशयास्पद वेबसाईट केल्या ब्लॉक

cm Pramod Sawant Zero Tolerance: एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली सुरू असलेल्या सायबर फसवणुकीवर कारवाई करत सायबर क्राईम विभागाने आत्तापर्यंत ५१२ संशयास्पद वेबसाईट लिंक्स ब्लॉक केल्या आहेत.
cm Pramod Sawant Zero Tolerance
cm Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील अवैध गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने नवीन स्पा सेंटर्सच्‍या नियमितीकरणावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तसेच एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली सुरू असलेल्या सायबर फसवणुकीवर कारवाई करत सायबर क्राईम विभागाने आत्तापर्यंत ५१२ संशयास्पद वेबसाईट लिंक्स ब्लॉक केल्या आहेत. दोषींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून, सार्वजनिक ठिकाणी पर्यटकांना त्रास देणाऱ्या व अनधिकृत एस्कॉर्ट सेवा देणाऱ्या दलालांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबले जाणार आहे, असे आश्‍‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी विधानसभेत दिले.

लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीच्या वाढत्या प्रकरणांवरून विधानसभेत जोरदार चर्चा झाली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी गोव्याची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची गस्‍त वाढविण्यात येणार असून ‘पिंक फोर्स’सारख्या विशेष पथकांना अधिक बळकट करण्यात येणार आहे.

cm Pramod Sawant Zero Tolerance
CM Pramod Sawant: 'हे पद लोकांच्या कल्याणासाठी, मी लोकांचा मुख्यसेवक'! मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन; Viral Video

तसेच २४ तास ‘महिला हेल्पलाईन’च्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ही लक्षवेधी सूचना आमदार विजय सरदेसाई, कार्लुस फेरेरा, वीरेश बोरकर, व्‍हेंझी व्हिएगस, युरी आलेमाव, क्रुझ सिल्वा आणि एल्टन डिकॉस्‍टा यांनी मांडली होती. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचे नाव देहविक्री रॅकेटशी जोडले जात असल्याबद्दल त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

चर्चेदरम्यान आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले की, गुगलवर एस्कॉर्ट सर्व्हिस शोधल्यास बांबोळी व साखळी परिसरातील अनेक वेबसाईट्‌स समोर येतात. आमदार असूनही आम्हाला हतबल वाटते. रस्त्यावर लोक उघडपणे ‘मुलगी हवी का?’ असे विचारतात. हे थांबले पाहिजे. आमदार विजय सरदेसाई यांनी पणजीतील १८ जून मार्गाचे उदाहरण देताना, लोहिया क्रांतीशी जोडलेला हा ऐतिहासिक रस्ता आता ‘स्पा स्ट्रीट’ बनत चालला आहे का? असा सवाल उपस्थित केला. एका बाजूला आध्यात्मिक पर्यटनाची चर्चा केली जाते.

cm Pramod Sawant Zero Tolerance
CM Pramod Sawant: प्रमोद सावंतांनी मुंबईत घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन; सुख-समृद्धीची केली प्रार्थना

मायकल लोबोंच्‍या विधानावरून गदारोळ

चर्चेदरम्यान आमदार मायकल लोबो यांनी ‘ही सेवा (एस्कॉर्ट) गोव्याचे पर्यटन चालवते’ असे विधान केल्याने सभागृहात गदारोळ माजला. विरोधी आमदारांनी या वक्तव्याला तीव्र आक्षेप घेत सभापतींसमोर धाव घेतली. लोबो यांचे हे विधान कामकाजातून वगळण्याचे आदेश सभापतींनी दिले. मात्र, त्‍यानंतर लोबो यांनी स्पष्ट केले की, अशा अवैध धंद्यांमुळे गोव्याच्या (Goa) पर्यटन व्यवसायाचे नुकसान होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com