आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांपैकी पाच जागांचं चित्र स्पष्ट असलं तरी या निवडणूकीत सर्वांच लक्ष लागुन आहे ते मुख्यत: सहाव्या जागेकडे. कारण या जागेसाठी लढत ही शिवसेनेचे उमेदवार संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात होणार आहे. दोन्ही उमेदवार कोल्हापूरचे असल्याने खासदारकी ही कोल्हापुरात येणार आहे. मात्र कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहे. ( Rajya Sabha elections: Sanjay Pawar's victory certain )
आज दुपारी 2 वाजेपर्यंत 281 आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान केले आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांपैकी पाच जागांचं चित्र स्पष्ट असलं तरी सहाव्या जागेची चुरस आहे. मात्र या लढतील राज्यसभा उमेदवार संजय पवार पहिल्या पसंतीच्या मतांनं विजयी होतील असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
पहिल्या पसंतीची मिळालेला मते
शिवसेना - 13 , काँग्रेस - 2, राष्ट्रवादी - 9, माकप - 1, शेकाप - 1, शंकरराव गडाख - 1 , बच्चू कडू (प्रहार) - 2, स्वाभिमानी - 1, सपा - 2 , एमआयएम - 2 , अपक्षः- 9
कोण आहेत संजय पवार ?
शिवसनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. गेल्या 9 वर्षांपासून ते कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून सक्रिय आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक स्थानिक प्रश्न, मराठी भाषिकांचा प्रश्न जो शिवसेनेच्या शिर्षस्थानी आहे. त्याचबरोबर अनेक मुद्दे घेऊन शिवसेना नेते संजय पवार हे सक्रिय आहेत. ते एक कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांनी अनेक आंदोलनांचे रणशिंग फुंकत मराठी भाषिकांसाठी मोठा लढा चालवला अशी त्यांची ओळख आहे.
पवार यांची स्थानिक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. कोल्हापुरात पक्षबांधणीचं जोमानं काम केलं. आण्णासाहेब पाटील महामंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. एवढंच नाहीतर, तीन वेळा कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. शिवसैनिक ते नगरसेवक आणि त्यानंतर जिल्हाप्रमुख असा सेनेतील त्यांचा प्रवास. उच्चशिक्षित आणि संघटन कौशल्य असल्यानं राजकारणावर त्यांची चांगली छाप आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.