RO RO Ferry: कोकणवासीयांसाठी खुशखबर! मुंबई ते विजयदुर्ग रो रो फेरी घेणार आणखी 2 थांबे; प्रवाशांसाठी मोठी सुविधा

Mumbai to vijaydurg ro ro service Stops: या सेवेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे दोन नवीन थांबे देण्यात आले आहेत.
Mumbai to vijaydurg ro ro service
Mumbai to vijaydurg ro ro serviceDainik Gomantak
Published on
Updated on

कोकण किनारपट्टीवरील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर करण्याच्या उद्देशाने मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान रो-रो (Ro-Ro) जलसेवा सुरू करण्यात आली आहे. या नव्या सागरी सेवेच्या माध्यमातून मुंबई ते कोकण हा प्रवास आता सुमारे सहा तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे रस्ते किंवा रेल्वे प्रवासाला लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

या सेवेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे दोन नवीन थांबे देण्यात आले आहेत. बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पाबाबत माहिती देताना सांगितले की, संबंधित जेटी उभारणीची कामे पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सागरी महामंडळाने विशेष प्रयत्न केले आहेत. पुढील महिनाभरात जयगड आणि वेंगुर्ला येथील थांबे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या जलसेवेचा सर्वाधिक फायदा कोकणातील पर्यटन क्षेत्राला होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वेंगुर्ला येथे थांबा उपलब्ध झाल्यामुळे मालवण, तारकर्ली आणि आचरा यांसारख्या लोकप्रिय पर्यटनस्थळांना पर्यटकांना सहज पोहोचता येणार आहे. तसेच या सागरी मार्गामुळे मत्स्यव्यवसाय आणि स्थानिक व्यापारालाही चालना मिळण्याची शक्यता आहे.

याशिवाय नेरूळ ते मुंबई दरम्यानही जलवाहतूक सेवा सुरू करण्याची योजना असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असला तरी तिकिटांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Mumbai to vijaydurg ro ro service
Mumbai Vijaydurga ferry: मुंबईतून कोकणात जाणारी फेरी आतून कशी दिसते? पहा Latest Photos

दरम्यान, दापोली तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी हर्णे बंदरालाही रो-रो सेवेचा थांबा द्यावा, अशी मागणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे. दापोली परिसरात रेल्वेची सुविधा नसल्यामुळे सागरी मार्ग हा प्रवासासाठी जलद आणि उपयुक्त पर्याय ठरू शकतो, असे त्यांनी नमूद केले.

Mumbai to vijaydurg ro ro service
Ro Ro Ferry Sapendra Divar : सापेंद्र-दिवाडी जलमार्गावर होणार 2 रो-रो फेरीबोटी! बेती-पणजी मार्गावरही मोठ्या आकाराची फेरीबोट

मुंबई–विजयदुर्ग रो-रो जलसेवेच्या सुरूवातीमुळे कोकणातील संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होणार असून पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com