Goa Gas Cylinder Shortage: कुणी गॅस देता का गॅस? राज्यात सिलिंडरचा तुटवडा, कळंगुटसह अनेक भागांत ग्राहकांच्या रांगा; हॉटेल व्‍यवसाय संकटात

Goa Gas Shortage 2026: गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याचे परिणाम आता गोव्यातही जाणवू लागले आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार राज्यातील वितरकांनी व्यावसायिक सिलिंडरचे बुकिंग बंद केल्याने हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.
Goa Gas Shortage 2026
Goa Gas Cylinder ShortageDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अमेरिका–इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे आखाती देशांतून भारतात होणारा गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याचे परिणाम आता गोव्यातही जाणवू लागले आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार राज्यातील वितरकांनी व्यावसायिक सिलिंडरचे बुकिंग बंद केल्याने हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.

बुधवारी अनेक भागांत वितरकांच्या आस्थापनांसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. काही ठिकाणी ग्राहक आणि वितरकांमध्ये तणावाचे वातावरणही निर्माण झाले. युद्धपरिस्थितीमुळे आखाती देशांतून भारताकडे येणाऱ्या गॅस सिलिंडरची जहाजे समुद्रात अडकून पडली आहेत. त्यानंतर देशभरात घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली. पुढे केंद्राच्या सूचनेनुसार राज्यातील वितरकांनी व्यावसायिक सिलिंडरचे बुकिंग रद्द केल्याने हॉटेल व्यावसायिकांना सिलिंडर मिळणे कठीण झाले.किनारी भागांतील हॉटेल व्यावसायिकांनी गॅस वितरकांच्या आस्थापनांसमोर रांगा लावल्या होत्‍या.

गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवताच सासष्टी तालुक्यात घरगुती सिलिंडरचा काळाबाजार सुरू झाल्याचे निदर्शनास आले. साधारणतः १८०० रुपयांना मिळणारा सिलिंडर बुधवारी तब्बल २५०० रुपयांना विकला गेला. तुटवड्याच्या भीतीने अनेक ग्राहकांनी तो विकत घेतल्याचेही स्‍पष्‍ट झाले.

Goa Gas Shortage 2026
Cylinder Gas Theft: धोकादायक! उघड्यावर LPG सिलिंडरमधून गॅसचोरी; एजन्सी व्यवस्थापकासह 3 जणांवर गुन्हा दाखल

ज्या हॉटेल व्यावसायिकांकडे सिलिंडरचा साठा उपलब्ध होता, त्यांनी हॉटेल्स सुरू ठेवली आहेत. मात्र काही पदार्थ ‘मेन्यू’मधून वगळले आहेत. तर, काही मालकांनी आपापली हॉटेल्स तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तुटवडा असाच कायम राहिल्यास दोन दिवसांत राज्यातील बहुतांश हॉटेल्स बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुढील पंधरा दिवस पुरेल इतका गॅस सिलिंडरचा साठा राज्‍याकडे सध्‍या उपलब्ध आहे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्यातील उपलब्ध साठ्याची माहिती मागवली आहे. त्याबाबतचा अहवाल पाठवण्यात येईल. केंद्राच्या निर्देशांनुसार पुढील निर्णय घेतला जाईल. घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर सध्या तरी कोणताही परिणाम झालेला नाही. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Goa Gas Shortage 2026
Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

मध्यम आकाराच्या एका रेस्टॉरंटला दिवसाला किमान एक ते दीड सिलिंडर लागतो. गॅस वाचवण्यासाठी सध्या दहा पदार्थांऐवजी केवळ चार पदार्थांचा ‘लिमिटेड मेन्यू’ ठेवला आहे. वेगवेगळे पदार्थ बनवण्याऐवजी मोठ्या प्रमाणात ठरावीक पदार्थ तयार करून गॅसची बचत केली जात आहे. टाकीचे पाणी संपल्यावर नळाला पाणी येईपर्यंत जशी प्रतीक्षा करावी लागते, तशीच अवस्था सध्या गॅसपुरवठ्याची झाली आहे. परिस्थिती लवकरच सुधारेल अशी आशा आहे. - आशिष शिरोडकर, हॉटेल व्यावसायिक

Goa Gas Shortage 2026
Gas Cylinder Explosion: चिंबल पंचायतीजवळील बंद घरात स्फोट, तब्बल 10 लाखांचे नुकसान; तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात

देशभरातील टंचाई

म. प्रदेशात हॉटेल व्यावसायिकांची कोंडी

यूपीमध्ये पोलिस संरक्षणात गॅसचे वितरण

बिहारमध्ये सकाळपासून एजन्सीबाहेर रांगा

राजस्थानमध्ये चढ्या दराने सिलिंडर विक्री

पंजाबमध्ये घरगुती सिलिंडरचा पुरवठा ठप्प

गुजरातमध्ये सिलिंडरच्या किमती गगनाला

तमिळनाडूमध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद

राजस्थानात गॅस टंचाईचा उद्योगांना फटका

‘इंडक्शन’ची विक्री आणखी वाढली

अनेक ठिकाणी पारंपरिक इंधनाचा वापर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com