राज्यसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेचा केला गेम; संजय पवार पराभूत

महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली आहे.
Rajya Sabha Election
Rajya Sabha ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यसभा निवडणुकीचं (Rajya Sabha Election) मतदान अखेर पार पडलं. राज्यातील 6 जागांसाठी एकूण 7 उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यामुळे सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली आहे. 10 जून ला मतदानानंतर संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. मात्र भाजप आणि महाविकास आघाडीकडून घेण्यात आलेल्या आक्षेपांमुळे मतमोजणीला उशीर झाला. (BJP defeated Shiv Sena in Rajya Sabha elections)

Rajya Sabha Election
“चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाऊन डोक्याला तेल लावावं...''

आक्षेपाचं राजकारण

जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील यांच्या हातात मतपत्रिका सोपविली तर यशोमती ठाकूर यांनी मतपत्रिका एजंटला दाखवली. आणि त्यामुळे ही दोन्ही मतं बाद करावीत अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र, पिठासीन अधिकाऱ्यांनी भाजपची ही मागणी फेटाळून लावली, त्यामुळे महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला म्हणायला हरकत नाही. राज्यसभा निवडणुकीसाठी आधीच घोडेबाजाराचे आरोप होत असल्याचे दिसून आले. आणि त्यातच राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक जेलमध्ये आहेत.

त्यांना मतदानाला परवानगी देण्यास कोर्टाने नकार दर्शविला. त्यामुळे एका एका मतासाठी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यानंतर काँग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांनी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला. सुधीर मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका बावनकुळे आणि शेलारांकडे दिल्याचा आरोप अमर राजूरकर यांनी केला होता.

गुलाल उधळणार का? मुख्यमंत्री म्हणतात, ऑफकोर्स…

मुख्यमंत्री मतदानावेळी विधान भवनात ठाण मांडून बसले होते. दुपारी साडे तीनच्या सुमारास मुख्यमंत्री विधान भवनातून बाहेर निघाले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना एक पार्टी नक्की म्हणायची का? असा प्रश्न केला आणि तेव्हा मला घरी जाऊन येऊ द्या. संध्याकाळी येतोच असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं. तर एका पत्रकाराने विजयाचा गुलाल उधळणार का? असं विचारलं असता ऑफकोर्स असं उत्स्फुर्त उत्तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं.

Rajya Sabha Election
''राज्यसभा निवडणुक : संजय पवारांचा विजय निश्चित''

राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election) महाविकास आघाडीला मात्र धक्का बसला आहे. मविआची 9 मते फुटली. आणि भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. शिवसेनेचे (Shivsena) संजय राऊत, काँग्रेसचे (Congress) इमरान प्रताप गढी, राष्ट्रवादीचे (NCP) प्रफुल्ल पटेल, भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे हे पहिल्या फेरीतच विजयाचे मानकरी ठरले.

पहिल्या पसंतीत संजय पवार यांना 33 आणि धनंजय महाडिक यांना 27 मते मिळाली. पहिल्या फेरीमध्ये भाजपचे पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना 48-48 मते मिळाली त्यामुळे त्यांच्या मताचा फायचा हा धनंजय महाडिक यांना झाला. राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चूरशीची लढत पहायला मिळाली. दुसरीकडे, शिवसेनेला मात देत भाजपने उमेदवार धनंजय महाडिक यांच्या रुपात एक जागा बळकावली. यामध्येच शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या दारून पराभव झाला यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. भाजपने आपली खेळी यशस्वी करत आपला सहावा उमेदवार निवडून आणला आहे.

एक-एक मत महत्त्वाचे होते. अशात शिवसेनेला (Shivsena) धक्का बसला कारण आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला होता. त्याचवेळी यशोमती ठाकुर, जितेंद्र आव्हाड व भाजपचे (BJP) मुनगंटीवार आणि रवी राणा यांचे मत वैध ठरवण्यात आले होते.

या निर्णयानंतर वैध आणि अवैध मते देखील मोजण्यात आली आणि त्यामध्ये 284 मते वैध ठरली होती. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आणि त्यानंतर झालेल्या मत मोजणीत आघाडीचे तीन उमेदवार निवडून आले. निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती... जय महाराष्ट्र !, असे म्हणत फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तब्बल 6 तासांच्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर अखेरीस आक्षेप घेण्यात आलेल्या 5 मतांपैकी केवळ शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले. घडी न घालता मतपत्रिका बाहेर आणणे, आपल्या पक्ष प्रतोदासह मतपत्रिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतोदाला दाखविणे हे भाजपचे आक्षेप निवडणूक आयोगाने मान्य केले, असून त्यांचे मत बाद ठरविण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com