Rajmata Jijau Dainik Gomantak
महाराष्ट्र

Rajmata Jijau: रणरागिणी राष्ट्रमाता जिजाबाई

जिजाऊंनी लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करून केली पुणे शहराची स्थापना

दैनिक गोमन्तक

जिजाबाई शहाजीराजे भोसले यांची ओळख म्हणजे राजमाता मॅासाहेब जिजाऊ. जिजामाता शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईसाहेब होत्या. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये बुलढाणा जिल्ह्यात 'सिंदखेडराजा' येथे झाला. जिजाबाईंना त्यांचे जिजाऊ नाव त्यांच्या बालपणापासूनच पडले होते. त्यांना रयतेबद्दल अन् मानवी धर्माबद्दल नेहमीच प्रेम वाटायचे! आपल्या पोटी जन्माला आलेल्या शिवबांना देखील त्यांनी लहानपणापासूनच रयतेबद्दल आणि मानवता धर्माबद्दल निष्ठेचे धडे दिले. जिजाऊ माता यांचेकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले

राजमाता जिजाऊंची ओळख म्हणजे मातृत्वाचा उच्चतम आदर्श,स्वराज्य जननी,स्वराज्याच्या मार्गदर्शिका आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई म्हणजे जिजाऊ. एवढीच ती ओळख आपणा सर्वांना माहित आहे. परंतु ज्या जिजाऊंनी स्वराज्याची संकल्पना मांडली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून साकारली त्या जिजाऊंची ओळख आपण एवढ्याच पुरती कायम ठेवली. आणि जिजाऊंच्या प्रगल्भवादी विचारांना बंदिस्त केले.

जिजाऊंनी अनेक वर्षापासून समाजीक विकासात आड येणाऱ्या अनेक जुनाट रुढी आणि परंपरा नाकारून नवीन पायंडे घातले, विकासाला चालना दिली. जवळपास 400 वर्षां पूर्वीच्या काळाचा विचार केला तर, समाजात अनेक धार्मिक अंधश्रद्धा होत्या वाईट रुढी, जातीभेद होते. धार्मिक अंधश्रद्धेच्या विरोधात बोलले तर धर्मातून बहिष्कृत केल्या जात होते. आणि अशा काळात जिजाऊंनी स्वतः पासून काही जुनाट रूढींना छेद देऊन सुधारणा केल्या इतकेच नव्हे तर त्या प्रजेच्या गळी उतरविल्या. जिजाऊंनी केलेल्या अनेक सुधारणांपैकी त्यांच्या जयंती निमीत्त आपण इथे त्यांच्या 2-3 सुधारणाविषयक कार्यांचा उल्लेख करू.

शापितभूमीनांगरूण पुणे शहराची स्थापना :- आदिलशहाने पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला आणि लोखंडी पहार रोवून त्यास केरसुणी, तुटलेली चप्पल आणि फुटकी कवडी अडकवून पुणे बेचिराख केले होते. आणि धर्मानुसार ही प्रतिके अशुभतेची मानल्या जात होती. यामुळे अशा ठिकाणी पुन्हा कोणी वस्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा वंश निर्वंश होईल, अशी धार्मिक समजुत पुरोहित वर्गाने घालून जनतेच्या मनात दहशत निर्माण केली होती. आणि अश्या निर्वस्ती ठिकाणी जिजाऊ बालशिवबांना घेऊन जिजाऊ 1641 ला बंगलोर (bangalore)वरून पुण्याला आल्या.

परंतू त्यांनी धार्मिक दहशतवादाला भीक न घालता स्वतः त्यांनी लोखंडी पहार काढून फेकली आणि शिवबाच्या हातात सोन्याचा नांगर देऊन पुण्याच्या (pune)भुमिला नांगरुन पुण्यभुमी केले. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला आणि पुणे शहराची स्थापना केली. जिजाऊंच्या या धाडसाने लोकांच्या मनातील भिती जाऊन धैर्याने शौर्याने जागा घेतली. जिजाऊने हा शकून-अपशकूनावर केलेला मोठा प्रहार होता. आदिलशहाने शापीत केलेल्या पुण्याच्या भुमीला जिजाऊने पुणीत केले.

याप्रकारे जिजाऊने मध्ययुगीन काळात समाजसुधारणेचा एक पायंडा घातला. जिजाऊच्या या कृतीमुळे झाले काय? तर लोकांच्या मनात असलेली पाप-पुण्याची भीती नाहीशी झाली. शुभ - अशुभ ही धार्मिक प्रतिके पुरोहितांनी लोकांना भीती दाखविण्याकरिता निर्माण केली आहेत. हे लोकांच्या मनात रूजविण्यात जिजाऊ यशस्वी झाल्यात. हाच जिजाऊंचा निर्भिडपणा , वैज्ञानिक दृष्टीकोन बालवयातच शिवरायांना मिळाला. मावळ्यांच्या अंगी उतरण्यास मदत झाली.

जातीपातीच्यापलिकडे:- आज तंत्रज्ञानाच्या युगात जातियतेचे चटके सहन करावे लागत आहेत. चारशे वर्षाआधी काय परिस्थिती असेल ? 400 वर्षां पूर्वीच्या काळाचा विचार केला तर, समाजात अनेक धार्मिक अंधश्रद्धा होत्या, वाईट रुढी, जातीभेद होते. धार्मिक अंधश्रद्धेच्या विरोधात बोलले तर धर्मातून बहिष्कृत केल्या जात होते. धार्मीक तेढ एवढा होता की, जातियतेमुळे माणूस माणसात राहिलेला नव्हता. अशा काळात जिजाऊ सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातील अठरा पगड जातीच्या मुलांसोबत शिवरायांना खेळू दिले.

तानाजी मालुसरे, शिवा काशिद, मदारी मेहतर, संभाजी जाधव, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, नुरखान बेग, दर्यासारंग, जोताजी केसरकर, रायप्पा असे अनेक नावे घेता येतील जे वेगवेगळ्या जाती- धर्माचे होते. हा जातीभेद नष्ट करण्याच्या दिशेने उचललेले त्या काळातील एक मोठचं पाऊल म्हणावे लागेल. स्वराज्याच्या पवित्र कार्यात सहभाग घेतला. जिजाऊने स्वराज्यातील या मावळ्यांना लेकरासारखे पोटाशी धरून माया लावून आईचे प्रेम दिले. त्यांच्या हातात तलवार देऊन मन मनगट मजबूत केले त्यांच्या मनात स्वाभिमान निर्माण केला आत्मविश्वासाने लढण्याचे बळ दिले.

धर्मांतर :- शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) नेताजी पालकरांच्या बाबतीत कित्ता गिरवला हे सर्वांना माहीत आहे. पण शिवाजी महाराजांना याचे बाळकडू ते त्यांच्या आई कडून. जिजाऊंच्या थोरल्या सून आणि शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांचा भाऊ बजाजी निंबाळकर हे एका लढाईत मुस्लिम सरदाराच्या तावडीत सापडले. नंतर त्यास मुसलमान करण्यात आले. ही बातमी जिजाऊंना समजली . जिजाऊने शिवरायांसोबत चर्चा केली आणि जिजाऊने बजाजी निंबाळकरांचे शुद्धीकरण करण्यास शिवरायांना सांगितले. शिवरायांच्या हस्ते.

जिजाऊ स्वतः शिखरशिंगणापूरला गेल्या. बजाजीला घेतलेला निर्णय सांगितला. बजाजीने जिजाऊंचे आभार मानले आणि त्यांच्या पायावर डोके ठेवले. शिखरशिंगणापूरच्या भूमितच बजाजीचे शुद्धीकरण करून घेतले आणि हिंदू धर्मातील एका नव्या सुधारणेला जिजाऊने सुरूवात केली. ज्या हिंदू धर्माने स्त्रीला तुच्छ लेखले होते. त्याच धर्मातील धर्म शुद्धीकरणाची सुरूवात जिजाऊ नावाच्या स्त्रिने केली. पुढे भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान स्त्रिया झाल्यात.

जिजाऊने 400 वर्षाआधी ज्या सुधारणेचा - परिवर्तनाचा पायंडा घातला त्याचे कौतुक केल्याशिवाय रहावत नाही. त्यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणां बरोबरच जाती - जातीतील, घरा - घरातील होणारे भांडणे सोडविले. लोकांच्या हातांना काम देवून आर्थिक प्रगतीस मोठाच हातभार लावला. जिजाऊ स्वतः धर्मनिष्ठ, परंपराप्रिय होत्या परंतु अंधश्रद्धाळू नव्हत्या, सनातनी विचारांच्या नव्हत्या. त्यांनी कायम नव विचारांचा स्वीकार करून प्रजेस सुद्धा स्वीकारावयास लावला होता.

- अभिजीत पडोळे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT