राऊतांनी सांगितला फडणवीसांचा पायगुण: गोव्यात गेले आणि भाजप फुटला

गोव्यात भाजपला महाराष्ट्रातून आर्थिक रसद, पण शिवसेना त्याच नोटांशी लढणार : राऊतांचे फडणवीसांना आव्हान
Goa Assembly Election 2022: sanjay raut said shiv sena will fight against corruption and  bjp in goa
Goa Assembly Election 2022: sanjay raut said shiv sena will fight against corruption and bjp in goaDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections 2022) जाहीर झाल्या आणि राजकीय घडामोडींना वेग आला. उत्तरप्रदेश (Uttar Pradesh), गोव्यात (Goa Assembly Election 2022) पुन्हा आपलीच सत्ता येणार असल्याचा दावा भाजपचे नेते करत आहेत. भाजप नेत्यांच्या या विधानावर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गोव्यात पुन्हा भाजपचेच सरकार येणार असल्याचा दावा केला त्यावर उत्तर देतांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) भाजपवर आणि फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

फडणवीस गोव्यात गेले आणि भारतीय जनता पक्ष फुटला

"देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातून गोव्यात गेले आणि आपण पाहिलं असेल की, देवेंद्र फडणवीस गोव्यात गेल्याबरोबर भारतीय जनता पक्षही फुटला. काल मंत्री मायकल लोबो यांनी भाजप पक्षाचा त्याग केला. प्रविण झांट्ये यांनीही पक्ष सोडला. त्यामुळे त्यांनी आधी पक्षांतर्गत जे काही युद्ध सुरू आहे ती लढाई लढावी आणि नंतर गोव्यात भाजप सरकार येणार असल्याचा दावा करावा," असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

Goa Assembly Election 2022: sanjay raut said shiv sena will fight against corruption and  bjp in goa
मी निवडणूक लढविणारच! उत्पलनी सुनावले शहांना

तुम्ही कितीही नोटा टाका...

"शिवसेना हा सामान्यांचा, बहुजनांचा आणि हिंदुत्ववादी पक्ष आहे. शिवसेना पक्ष हा भाजपच्या नोटांना पुरून उरणारा पक्ष आहे. महाराष्ट्रातून नोटांच्या बॅगा कुठे कीती आणि कशा जातात हा सगळा प्रकार मला माहित आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझा शब्द आहे की तुम्ही कितीही नोटा टाका तुमच्या नोटांशी आम्ही लढू आणि जिंकू," असा टोलाही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपला लगावला आहे.

सत्तेत येणाऱ्या पक्षांना कधी गळती

"जे काही सर्वेमुसार ओपिनियन पोल येत आहेत त्यानुसार, उत्तरप्रदेशात भाजप पुन्हा सत्तेत येईल असे म्हटले जात आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. सत्तेत येणाऱ्या पक्षांना कधी गळती लागत नाही. मंत्री पक्ष सोडत नाहीत, आमदार पक्ष सोडत नाहीत आणि प्रमुख कार्यकर्तेही पक्ष सोडत नाहीत. मात्र इथे पुर्ण परिस्थिती उलट दिसत आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, उत्तरप्रदेश आणि गोव्याचा राजकीय प्रवास हा परिवर्तनाच्या दिशेने सुरू आहे," असे राऊत म्हणाले.

Goa Assembly Election 2022: sanjay raut said shiv sena will fight against corruption and  bjp in goa
पत्नीला तिकीट हवे होते म्हणून लोबोंनी सोडला BJP पक्ष

महाराष्ट्रातून गोव्यात नोटांच्या बॅगा...

आमची खरी लढाई गोव्यात नोटांशीच आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते ज्या प्रकारे गोव्यात नोटांचा पाऊस पाडत आहेत विशेष करुन महाराष्ट्रातून ज्या काही नोटांच्या बॅगा गोव्यात जात आहेत त्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष त्या नोटांशी नक्की लढेल. या नोटांच्या दबावाखाली न येता आपला आणि गोव्याच्या विकासाचा विचार कोण करणार या सगळ्यांचा विचार करून मतदान करा हे गोव्याच्या जनतेला सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू असे राउत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com