Prison canteen in sweets Dainik Gomantak
महाराष्ट्र

तुरूंग शिक्षा देण्याची जागा आहे की मजा करण्याची?

कैद्यांचा टाईम आलाय! नॉनव्हेजसह 30 प्रकारच्या मिठाईंचा तुरूंगात घेता येणार आस्वाद

दैनिक गोमन्तक

मुंबई: तुरूंग शिक्षा देण्याची जागा आहे की मजा घेण्याची जागा आहे ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण महाराष्ट्रात परिस्थितीच तशी निर्माण झाली आहे. कैदी आता शिक्षेसाठी नव्हे तर मौजमजेसाठी तुरूंगात जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये तुरूंगातील कॅन्टीनमध्ये चिकन, मटण आणि सर्व प्रकारच्या मिठाई कैद्यांना खायला मिळणार आहे. त्यामुळे तुरूंगात असुनही कैद्यांना या सर्व गोष्टी खायला मिळणार आहेत. (Prison canteen in Maharashtra will provide chicken mutton and all kinds of sweets to inmates)

या संदर्भात महाराष्ट्राचे अतिरिक्त डीजीपी सुनील रामानंद यांनी मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित करून ही माहीती दिली. मूलभूत खाद्यपदार्थाबरोबरच या स्वादिष्ट वस्तू देखील कैद्यांच्या कॅन्टीनमध्ये ठेवल्या जातील. अशा एकूण 30 स्वादिष्ट वस्तू आता कॅन्टीनमध्ये कैद्यांच्या जेवणासाठी ठेवण्यात येणार आहे. सुनील रामानंद यांनी त्या डिशेसची यादी जाहीर केली आहे.

आता कैद्यांचा टाइम येणार

आता कैद्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तुरूंगात मिळणार आहेत. बुधवारी प्रेस कौन्सिलमध्ये हि लिस्ट जाहीर करण्यात आली. त्यामध्ये मिठाई, बेकरी आयटम, ड्राई फ्रूट्स, हंगामी फळे, दही, पनीर, लस्सी, शरबत, मांसाहारी पदार्थ, कचोरी, चिकन, मटण, शीरा, लाडू, शकरपाळे, चकली, करंजी, श्रीखंड, अम्रखंड, शेव, पापडी, लोणच, समोसा, च्यवनप्राश, म्हैसूरपाक, जिलेबी, पेडे, चहा, कॉफी, फेस वॉश, हळद मलई, एनर्जी बार, ग्लुकॉन डी, बाथ साबण, अगरबत्ती, बूट पोलिश, ग्रीटिंग कार्ड, मिक्स वेज, अंडी करी, वडा पाव, कॉर्न फ्लेक्स, बोर्नविटा, चॉकलेट, उकडलेले अंडे, पनीर मसाला, पूरण पोळी, आवळा कँडी, मुरब्बा, गुलाब जामुन, आंबा, पेरू, बदाम शेक, ताक, दूध, गूळ , गाईचे शुद्ध तूप, लोणी, खिचडी, दिंक लाडू, बेसन लाडू, आलू भजी अशा पदार्थांचा समावेश करण्यात येत आहे.

या गोष्टीं खरेदी करण्यासाठी कैद्यांकडे पैसे कसे येणार?

कारागृहात कैदी विविध प्रकारचे काम करतात. त्या बदल्यात त्यांना त्या कामासाठी पैसै दिले जातात. ते त्या पैशांचा वापर कॅन्टीनमधून आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी करू शकतात. या व्यतिरिक्त, कैदी निश्चित रक्कम खर्च करू शकतात जे कैद्यांच्या कुटुंबियांना पाठविण्याची परवानगी आहे. याशिवाय अतिरिक्त डीजीपी सुनील रामानंद यांनी मुंबईतील आर्थर रोड जेल बहुमजली करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. सरकारने हा प्रस्ताव मंजूर केल्यास जेलमधील कैद्यांचे वेतन 5 हजारांपर्यंत वाढणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील खेड्यापाड्यात, दुर्गम भागात पोहोचणार स्टारलिंकचे हायस्पीड इंटरनेट; CM सावंतांची इलॉन मस्कच्या कंपनीसोबत चर्चा

VIDEO: 14 षटकार, 9 चौकार... वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली! आशिया कपमध्ये 171 धावांची तुफानी खेळी

Goa Crime: विवाहीत असून जबरदस्तीनं अल्पवयीन मुलीशी केलं लग्न, मुख्य आरोपीसह आई व दोन नातेवाईक अडकले; कोर्टाकडून आरोप निश्चित

Omkar Elephant: 'ओंकार'चं रौद्ररुप! वन कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत बैलाचा बळी, दावणीला बांधलेल्या बैलाला हत्तीने चिरडले

प्रँक राजकारण! गोंयकारांना फसवल्याचा सरदेसाई - परबांचा एकमेकांवर आरोप Watch Videos

SCROLL FOR NEXT