नाना पटोलेंचा 'यू टर्न' !

आपल्यावर पाळत ठेवली जाते, आपले फोने टॅपिंग केले जातात असले गंभीर आरोप आपल्याच सरकारवर केल्या नंतर महाविकासआघाडीतिल अनेक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला
Nan Patole's 'U Turn' on phone tapping
Nan Patole's 'U Turn' on phone tappingDainik Gomantak
Published on
Updated on

मागील काहीदिवसांपासून आपल्याच सरकारवर शरसंधान साधणारे नाना पटोले(Nana Patole) यांनी आता आपल्याच वक्त्यावरून यु-टर्न घेतला आहे. नाना पटोले बेधडक पणे आपले मत मांडत गेल्या काही दिवसांपासून स्वबळाची भाषा तर करत होतेच मात्र आपल्याच सरकारला घरचा आहेर देत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री आपल्यावर पळत ठेवून आहेत असे सांगत थेट उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray), अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावरच टीकास्त्र सोडले होते आणि त्यांच्या याच विधानाने सर्वांचेच डोळे वधारले होते आणि महाविकासआघाडी सरकार गोत्यात येणार असे बोलले जात होते.

मात्र आता त्यांनी आपल्या या विधानावर घुमजाव करत माझ्या बोलण्याचा विपर्यास करत माध्यमांनी चुकीचा व्हिडिओ चालवला असून माझा हा आरोप राज्य सरकारवर नसून केंद्र सरकार वर होता अशी सारवासारव केली आहे.

Nan Patole's 'U Turn' on phone tapping
SSC 23 जुलै तर HSC निकाल 2 ऑगस्टपर्यंत लागण्याची शक्यता

आपल्यावर पाळत ठेवली जाते, आपले फोने टॅपिंग केले जातात असले गंभीर आरोप आपल्याच सरकारवर केल्या नंतर महाविकासआघाडीतिल अनेक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला.ज्यांना महाविकासआघाडीतिल सर्वासार्वे मानले जाते असे राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर नाना पटोले यांच्यासारख्या लहान माणसावर मी बोलणार नाही असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्षावर जहरी टीकाच केली. आता खुद्द शरद पवार बोलले म्हण्टल्यावर ही गोष्ट थेट दिल्ली दरबारीच जाऊन पोहोचली आणि दिल्लीतून नाराजी आल्यावरच नाना पटोले यांनी आपल्याच विधानावर घुमजाव केला असेल का ?

मात्र यांची पक्षाकडून कानउघाडणी झाल्यावर त्यांनी आपली भूमिका बदलली. त्यांच्या सततच्या बेताल वक्तव्यांनी काँग्रेस नेते मात्र अस्वस्थ झाले असल्याचीही माहिती समोर येत आहे.

आता एकाच सरकारमध्ये राहून पटोलेंनी अशी टीका करणं आणि आपलंच विधान आपल्याच अंगलट आलं की माध्यमांवरती खापर फोडणं हे कितपत योग्य आहे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com