Panval Waterfall Dainik Gomantak
महाराष्ट्र

Panval Waterfall: कोकणात पावसाचं धूमशान! मुंबई-गोवा महामार्गावरील पानवल धबधब्याचं खुललं मनमोहक रुप

Panval Waterfall Heavy Rain Update: मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीतील (Ratnagiri) पानवल धबधबा पावसामुळे प्रावाहित झाला. मुसळधार पावसामुळे पानवल धबधब्याचे मनमोहक रुप पाहायला मिळत आहे. निसर्गाच्या राजीतील हा धबधबा पर्यटकांना खुणावतो.

Manish Jadhav

गोव्यासह महाराष्ट्रात पावसानं धूमशान घातलं आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे कोकणातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंदुदुर्गमध्ये मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे नदी, नाले, धबधबे ओसांडून वाहू लागले आहेत.

पानवल धबधबा

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीतील (Ratnagiri) पानवल धबधबा पावसामुळे प्रावाहित झाला. मुसळधार पावसामुळे पानवल धबधब्याचे मनमोहक रुप पाहायला मिळत आहे. निसर्गाच्या राजीतील हा धबधबा पर्यटकांना खुणावतो. मागील तीन-चार दिवसांपासून या भागात पावसाची संततधार सुरु असल्याने पानवल धबधबा ओसांडून वाहत आहे. पानवलचा हा धबधबा रत्नागिरी स्टेशनपासून सात-आठ किलोमीटर अंतरावर आहे.

कोकणतात पावसाचा जोर कायम

कोल्हापूर, सातारा, सांगलीसह कोकणात पावसाची जोर कायम आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असून रत्नागिरीला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे या येथील नदी नाल्यांना पूर आला आहे. तर येथील धबधबे देखील आता प्रवाहित झाले आहेत. दुसरीकडे, सततच्या पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: एप्रिल महिन्यात अग्निपरीक्षा! 'या' राशीच्या नशिबात शनी अन् राहु-केतूचा 'डेंजर झोन'; ग्रहांची स्थिती ठरणार घातक

8th Pay Commission : पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT