"जय शिवाजी, जय भवानी"! शिवजयंतीदिवशी सांगेत मोठा उत्सव! छत्रपतींच्या भव्य पुतळ्याचे होणार लोकार्पण

Shivaji Maharaj Statue Sanguem Goa: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सांगे येथे गुरुवार, १९ रोजी सायं. ६ वा. बसस्थानकाजवळ शिवरायांच्या भव्य पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे.
Shivaji Maharaj Statue Sanguem Goa
Shivaji Maharaj Statue Sanguem GoaDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सांगे येथे गुरुवार, १९ रोजी सायं. ६ वा. बसस्थानकाजवळ शिवरायांच्या भव्य पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. हा तीन दिवसीय उत्सव संगमपूर महाल परिसरात पार पडणार असून, गोवाभरातून किमान सहा हजार शिवभक्त उपस्थित राहतील, अशी माहिती समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी समितीचे अध्यक्ष संगमेश्वर नाईक, सचिव सुप्रज नाईक तारी, खजिनदार संजय रायकर, उपसचिव दिनेश भंडारी, उपखजिनदार निखिल नाईक तारी, सदस्य विद्धेश खांडोळकर आणि महाबळेश्वर शिरोडकर उपस्थित होते. या भव्य सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले.

बुधवार, १८ रोजी साय प्रोडक्शन, मुंबई निर्मित ‘शिवसंस्कार महोत्सव २०२६’अंतर्गत शिवचरित्रावर आधारित १५० चित्रकाव्यांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी १०.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. सायं. ६.३० वा. ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ हा विशेष कार्यक्रम सादर होईल. ४३ नवगीतांमधून साकारलेले संगीतमय शिवचरित्र यात सादर करण्यात येणार आहे.

गुरुवार, १९ रोजी सायं. ४.३० वा. शासकीय पॉलिटेक्निक, काकोडा येथून मोटरसायकल मिरवणुकीला प्रारंभ होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक पुढे जाईल. कोर्ट परिसरात शिवसाम्राज्य समितीतर्फे स्वागत करण्यात येणार आहे.

मिरवणुकीत सहभागी संत-महंत तसेच सद्‌गुरू श्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले जाईल. त्यानंतर मिरवणूक संगमेश्वर तीर्थक्षेत्री प्रस्थान करेल. तेथे संत-महंत व मान्यवरांच्या हस्ते संगमेश्वर पूजन व महाआरती होईल. पारंपरिक घोडेमोडणी आणि श्री पाईकदेव शिमगोत्सव पथकाच्या सहभागाने भव्य कलश शोभायात्रा पुतळास्थळी पोहोचेल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल.

Shivaji Maharaj Statue Sanguem Goa
Chhatrapati shivaji Maharaj Statue: 83 फूट उंच पुतळा, 2.3 टनाची तलवार, मालवण-राजकोट येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण

मर्दानी खेळ, नाट्यप्रवेश

शुक्रवार, २० रोजी ‘हिंदू तेज शिवकालीन मर्दानी आखाडा, कराड’ यांच्यातर्फे मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येईल. तसेच विविध लोककला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. शिवचरित्रावर आधारित तीन ऐतिहासिक नाट्यप्रवेशही सादर केले जातील.

Shivaji Maharaj Statue Sanguem Goa
Sanguem: ..अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली! सांगेतील माय-लेकीला मिळाला हक्काचा निवारा; मंत्री फळदेसाईंचा पुढाकार

मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची उपस्थिती

गुरुवार, १९ रोजी सायंकाळी ‘गोवा स्पिरिच्युएल फेस्टिव्हल २०२६’चे उद्‌घाटन होईल. या सोहळ्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री सुभाष फळदेसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com