Omkar Elephant Vantara Dainik Gomantak
महाराष्ट्र

VIDEO: "सह्याद्रीत जन्म, सह्याद्रीतच राहणार...", 'ओंकार हत्ती'ला वनतारात हलवण्याच्या निर्णयाला सिंधुदुर्गवासियांचा तीव्र विरोध

Omkar Elephant Vantara: सिंधुदुर्गातील 'ओंकार हत्ती'च्या हालचाली आणि सुरक्षिततेसंदर्भात सुरू असलेल्या चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे.

Sameer Amunekar

सावंतवाडीत: सिंधुदुर्गातील 'ओंकार हत्ती'च्या हालचाली आणि सुरक्षिततेसंदर्भात सुरू असलेल्या चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे. ओंकार हत्तीला वनतारामध्ये स्थानांतरित करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिल्यानंतर प्रशासन आणि जनतेमध्ये मतभेद उभे राहिले आहेत.

या संदर्भातील सर्व प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी राज्याचे पालकमंत्री नीतेश राणे आणि आमदार दीपक केसरकर वनतारा प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

वनताराच्या पथकाने यापूर्वी दोनवेळा परिसर भेट देऊन पाहणी केली असून आता तिसऱ्यांदा अधिकृतरित्या पथक येणार आहे, अशी प्राथमिक माहिती प्रशासन स्रोतांकडून देण्यात आली आहे.

मात्र या निर्णयाला सिंधुदुर्गमधील नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. ‘सह्याद्रीत जन्म, सह्याद्रीतच राहणार’ या भावना व्यक्त करत स्थानिकांनी ओंकार हत्तीला वनतारामध्ये हलविण्याला ठाम विरोध दर्शविला आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की ओंकार हा सह्याद्रीचा अविभाज्य घटक असल्याने त्याचे स्थलांतर करणे अन्यायकारक आहे. यामुळे प्रशासन आणि स्थानिकांमध्ये या प्रश्नावर मतभेद अधिक गडद होताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

Bicholim Online Fraud: 'इन्व्हेस्टमेंट'च्या नावाखाली फसवणूक! लाखोंचा गंडा घालणाऱ्या संशयिताला मध्यप्रदेशातून अटक; डिचोली पोलिसांची मोठी कारवाई

'माझे घर' योजना अडचणीत, उच्च न्यायालयाची गोवा सरकारला 'नोटीस'; उत्तरासाठी 3 फेब्रुवारीपर्यंत मुदत

भारतात क्रिप्टो चलन कोठून आणि कसे खरेदी करावे? संपूर्ण प्रक्रिया, संभाव्य धोके तसेच काय काळजी घ्यावी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT