Nitin Gadkari Dainik Gomantak
महाराष्ट्र

Nitin Gadkari यांच्या नावाने फेक पोस्ट व्हायरल; नागपूर पोलिसांत तक्रार दाखल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नावाने सोशल मीडियावर बनावट पोस्ट व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

Nitin Gadkari: पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने फेक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये नितीन गडकरी राज्यातील भाजप नेत्यांना कानपिचक्या देत आहेत. पण ही पोस्ट फेक असल्याचे गडकरी यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले असून याप्रकरणी नागपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुण्यातील कसबा निवडणूक निकालाबाबात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नावाने व्हॉट्स ॲप ग्रूपवर खोटे आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये व्हायरल केली जात आहेत.

नागपूर पोलिसांकडे याबाबत तक्रार करण्यात आली असून गडकरी यांच्या नावाने अशा प्रकारे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती नागपूर पोलिसांना करण्यात आली आहे, अशा आशयाचे ट्वीट नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

कसबा पोटनिवडणुकीत मविआचे उमेदवार रंवीद्र धंगेकरांचा दणदणीत विजय झाले आहे. विजयानंतर रवींद्र धंगेकरांनी प्रतिक्रिया दिली की मविआच्या कार्यकर्त्यांनी विजयासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतासाठी खूशखबर! कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांना 100 टक्के टॅरिफमधून सूट, अमेरिकेत भारतीय औषधांची निर्यात होणार सोपी

Viral Post: "आई-वडिलांना देव मानू नका..." CEO च्या 'त्या' वादग्रस्त पोस्टने खळबळ; सोशल मीडियावर दोन गटांत जुंपली, वाचा संपूर्ण प्रकरण

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

संपादकीय: पैशांची मस्ती अन् सत्तेचा माज...

Telangana CM Controversial Statement: 'प्रभु श्री राम श्रीमंतांचे, तर भगवान शिव गरिबांचे देव', काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं खळबळ; भाजप आक्रमक VIDEO

SCROLL FOR NEXT