Goa Mock Drill: चक्रीवादळ आल्यास आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा किती सज्ज ? आयवा किनाऱ्यावर 'अशी' झाली तपासणी...

मॉक ड्रिलमध्ये एनडीआरएफसह नौदलाचे हेलिकॉप्टर, डॉग स्कॉडचाही समावेश
Mock Drill
Mock DrillDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Mock Drill: हेलिकॉप्टरची घरघर अगदी वसाहतीच्या जवळ ऐकू आली आणि आयवा-दोनापावला किनाऱ्यालगत असणाऱ्या घरातील लोक आवाजाच्या दिशेने धावू लागले. नक्की काय चालले आहे, हे कोणास कळत नव्हते.

हेलिकॉप्टर जलक्रीडा प्रकल्पाच्या इमारतीवर एका जागी स्थिरावले. त्यातून जवानाला नेण्यात आले. हा जवळपास दहा मिनिटांचा थरार अनेकांना प्रत्यक्षात काहीतरी अघटित घडल्याचेच दर्शवित होता. परंतु थोड्या वेळाने हा मॉक ड्रिलचा प्रकार असल्याचे लक्षात नागरिकांची जीव भांड्यात पडला.

राज्यात चक्रीवादळ घडल्यास आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा किती सज्ज आहे, याविषयी पुणे (महाराष्ट्र आणि गोवा) येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी आपली कार्यक्षमता तपासण्यासाठी सकाळी आयवा किनाऱ्यावरील जलक्रीडा प्रकल्पाच्या इमारतीमध्ये मॉक ड्रिल केले.

Mock Drill
Goa Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशन आता 'इतकेच' दिवस; विजय सरदेसाई, युरी आलेमाव यांची टीका...

संभाव्य चक्रीवादळ आपत्कालीन प्रसंगांचा सामना करण्याच्या तयारीचा स्तर अधिक कार्यक्षम करण्याचा या कवायतींचा मुख्य उद्देश होता. यासाठी नौदलाचे हेलिकॉप्टर, डॉग स्कॉडचाही वापर केला. इमारतीवर अडकलेल्या लोकांना कशाप्रकारे हेलिकॉप्टरमधून नेले जाते, याचे हे प्रात्यक्षिक होते.

त्याचबरोबर एखाद्या अडगळीच्या जागेत पडलेल्या व्यक्तीचा शोध श्‍वानाच्या साह्याने घेऊन, त्याला उपचारासाठी इमारतीवरून कशाप्रकारे पाठविले जाते. श्‍वानाला इमारतीवरून किंवा हेलिकॉप्टरमधूनही कशाप्रकारे इच्छित स्थळी उतरविले जाते, याचे प्रात्यक्षिक याप्रसंगी करण्यात आले.

Mock Drill
Babush Monserrate: 'मोन्सेरात यांचा पोलीस काराभरात हस्तक्षेप असायचा, त्यामुळे....'; पोलीस उपअधीक्षकांची न्यायालयात साक्ष

प्रात्यक्षिकात वेळेला महत्त्व

राज्य सकारच्या मदतीने एनडीआरएफच्या दोन पथकांचे पणजी व कोलवा येथे मॉक ड्रिल झाले. त्यात एकूण 55 जवानांचा सहभाग होता. दरम्यान, विद्यापीठ परिसरात तयार करण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये किनाऱ्यावरून उपचारासाठी लोक किती वेळात आणले जातील, याचे प्रात्यक्षिक आणि वेळ नोंदविण्यात आली. आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने प्रत्येक कार्य किती वेळात होते, याची नोंद केली जात होती.

'एनडीआरएफ''साठी आस्नोडा येथे जागा

एनडीआरएफचे निरीक्षक अनंत बाबुलकर म्हणाले की, वर्षभर नियमीतपणे मॉक ड्रिलची कवायत रेल्वे, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये केली जाते. गोव्यात बार्देश तालुक्यातील आस्नोडा येथे येथील राज्य सरकारने एनडीआरएफसाठी जागा दिली आहे. त्याठिकाणी एक पथक कार्यरत असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com