Pune mountaineering team reaches Everest peak Dainik Gomantak
महाराष्ट्र

Pune Giripremi: पुण्याच्या टीमकडून एव्हरेस्ट सर; 'गिरिप्रेमी'ची तिसरी मोहीम यशस्वी, देशभरातून कौतुकाचा वर्षाव

Mount Everest Scaled Giripremi: नेपाळमधील पारंपरिक साऊथ कोल मार्गाने ही मोहीम पूर्ण करण्यात आली. संस्थेची २०१२ आणि २०१३ नंतरची ही तिसरी यशस्वी मोहीम आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पुणे: प्रतिकूल हवामान आणि ‘डेथ झोन’मधील आव्हानांवर मात करत पुण्याच्या ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या गिर्यारोहकांनी गुरुवारी (ता. २१) पहाटे जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टवर (८,८४८.८६ मीटर) यशस्वीरीत्या तिरंगा फडकवला.

नेपाळमधील पारंपरिक साऊथ कोल मार्गाने ही मोहीम पूर्ण करण्यात आली. संस्थेची २०१२ आणि २०१३ नंतरची ही तिसरी यशस्वी मोहीम आहे.ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचे गिर्यारोहक विवेक शिवदे, मिहीर जाधव आणि अखिल काटकर यांनी सर्वोच्च शिखर सर करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.

या चढाईत त्यांच्याबरोबर लाक्पा शेर्पा, उर्गेन शेर्पा आणि लाक्पा तेनजी शेर्पा या अनुभवी शेर्पा गिर्यारोहकांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. मोहिमेसाठी पथक दोन एप्रिलला पुण्यातून रवाना झाले होते. एव्हरेस्टसारख्या अतिउंचीवरील वातावरणाशी जुळवून घेणे सर्वांत कठीण असते. त्यासाठी पथकाने सलग आठ आठवडे परिसरात राहून सराव केला. मुख्य मोहिमेआधी ‘लोबुचे ईस्ट’ शिखर सर करून आणि एव्हरेस्टवरील ‘कॅम्प २’पर्यंतच्या सराव फेऱ्या पूर्ण करून पथकाने तयारी भक्कम केली होती.

‘डेथ झोन’मधील १० तासांची झुंज

अंतिम शिखर चढाई मोहिमेला रविवारी सुरुवात झाली. उच्च कॅम्पमार्गे पथक शिखराच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. यंदा हवामानाची साथ असली, तरी आठ हजार मीटरवरील ‘डेथ झोन’मध्ये गिर्यारोहकांना सलग १० तासांहून अधिक काळ अत्यंत आव्हानात्मक चढाई करावी लागली. याविषयी बोलताना उमेश झिरपे म्हणाले, ‘‘यंदा एव्हरेस्टवर हवामानाची अनुकूल संधी नेहमीपेक्षा खूपच कमी होती. जेट स्ट्रीम सतत सक्रिय असल्याने शिखर चढाईसाठी उपलब्ध वेळ अत्यंत मर्यादित होता. योग्य वेळ साधत सुरक्षितरीत्या चढाई पूर्ण करणे हे एक मोठे आव्हान होते, जे संघाने यशस्वीपणे पार केले. हवामानाची साथ नक्कीच मिळाली; पण यशामागे संघाची शिस्त, संयम, मानसिक ताकद आणि सांघिक कार्य सर्वांत महत्त्वाचे ठरले.’’

पर्यावरण संवर्धन अन् तंदुरुस्तीचा संदेश

केवळ शिखर सर करणे हाच मोहिमेचा उद्देश नव्हता. भारत सरकारच्या ‘फिट इंडिया’ अभियानाला पाठिंबा देत, शारीरिक तंदुरुस्ती आणि सक्रिय जीवनशैलीचा संदेश यातून देण्यात आला. तसेच, वाढते तापमान पाहता हिमनद्यांचे संवर्धन, जबाबदार गिर्यारोहण आणि हवामान बदलाबाबत जनजागृती केली.

दिवसभरात २७४ जणांना यश

नेपाळच्या बाजूने ‘माउंट एव्हरेस्ट’ शिखर सर करणाऱ्या २७४ गिर्यारोहकांमध्ये तीन भारतीयांचा समावेश होता. एका दिवसात एव्हरेस्ट सर करणाऱ्यांची ही आतापर्यंतची सर्वाधिक विक्रमी संख्या ठरली आहे. बुधवारी सर्व २७४ गिर्यारोहक ८८४८.८६ मीटर उंचीच्या या शिखरावर यशस्वीरीत्या पोहोचले. यापूर्वी मे २०१९ मध्ये नेपाळच्या बाजूने एका दिवसात २२३ जणांनी ‘एव्हरेस्ट’ सर केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT