
पुणे: संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह आणि बाप्पांच्या आगमनाची तयारी रंगात असताना फ्लाय९१ या विमान सेवा कंपनीने पुणे-सिंधुदुर्ग-पुणे मार्गावरील उड्डाण संख्या वाढवण्याची घोषणा केली आहे.
पुणे–सिंधुदुर्ग–पुणे मार्गावर २४, २९, ३१ ऑगस्ट आणि ५ व ७ सप्टेंबर रोजी अतिरिक्त उड्डाणे ठेवण्यात आली आहेत. या उड्डाणांची तिकिटे आता विमानकंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अशी माहिती कंपनीच्या अधिकरांनी दिली आहे.
"गणेशोत्सव हा आमच्या ग्राहकांसाठी खास काळ आहे, जेव्हा अनेक जण कुटुंबीयांसोबत प्रवास करतात. पुणे–सिंधुदुर्ग–पुणे मार्गावरील अतिरिक्त उड्डाणांमुळे आम्ही प्रवाशांना अधिक सोय, लवचिकता आणि विश्वासार्ह ‘लास्ट माइल’ कनेक्टिव्हिटी देत आहोत." असे फ्लाय९१चे व्यवस्थापकीय संचाला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मानवोज चाको यांनी सांगितले.
गणेश चतुर्थी हा भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील, एक अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा सण आहे. या काळात हजारो भक्त आपल्या मूळ गावी परतून बाप्पांच्या उत्सवात सहभागी होतात. यावर्षी गणेशोत्सवाची सुरुवात २७ ऑगस्ट रोजी होणार असून, भक्तांना बाप्पांचे दर्शन घेताना सुखद आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळावा म्हणून कंपनीने उड्डाणांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
याआधी स्वातंत्र्य दिनाच्या प्रवासाची गर्दी हाताळण्यास फ्लाय९१ ने १४, १५ आणि १८ ऑगस्ट रोजी पुणे–गोवा–पुणे आणि पुणे–सिंधुदुर्ग–पुणे मार्गांवर अतिरिक्त उड्डाणे सुरू केली होती.
गोव्यात मुख्यालय असलेली फ्लाय९१ ही विमान कंपनी भारतातील प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर भर देते, विशेषतः कमी सेवा मिळणाऱ्या टियर २ आणि टियर ३ शहरांना जोडण्यावर लक्ष केंद्रित करते. महाराष्ट्रात ही विमान कंपनी सिंधुदुर्ग, जळगाव, सोलापूर आणि पुणे अशा महाराष्ट्रात ही विमान कंपनी सिंधुदुर्ग, जळगाव, सोलापूर आणि पुणे अशा चार ठिकाणांना जोडते तसेच देशांतर्गत एकूण आठ गंतव्यस्थळांवर सेवा पुरवते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.