Narendra Modi in Pune  Dainik Gomantak
महाराष्ट्र

पुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान मोदींच्या एमआय टी महाविद्यालयातील सभेला येणाऱ्या लोकांना काळा रंग वर्ज्य करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Modi in Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान, मोदींच्या हस्ते पुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11.30 वाजता गरवारे मेट्रो स्टेशन प्रकल्पाचे उद्घाटन केले. पुढे त्यांची 12 ते 1 दरम्यान एमआय टी महाविद्यालयात सभा घेतली. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींच्या एमआय टी महाविद्यालयातील सभेला येणाऱ्या लोकांना काळा रंग वर्ज्य करण्यात आला आहे. या सभेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ज्यांनी काळ्या रंगाचा शर्ट घातला असेल त्यांना तो काढण्यास सांगीतला जातो आहे. एवढच नाही तर ज्यांनी शर्टच्या आतमधे काळ्या रंगाचा बनियन आणि पायात काळ्या रंगाचे मोजे घातले आहेत त्यांनाही ते काढण्यास सांगण्यात आले आहे आणि नंतर प्रवेश देण्यात आला आहे. काळ्या रंगाचा मास्क, कपडे, मोजे म्हणजे एकंदरीत काळा रंग वावडा ठरला आहे. मोदींच्या (Narendra Modi) सभेत काळ्या रंगाचा उपयोग करून कोणी निषेध करु नये यासाठी हे कडक नियम अंमलात आणाला जातो आहे.

मोदींचा कार्यक्रम

12 ते 1- एमआयटी येथील कार्यक्रमासाठी उपस्थित.

1:45 वाजता लवळे येथील सिंबायोसिस येथील कार्यक्रमाला उपस्थिती.

2:30 वाजता विमानतळाकडे रवाना.

पंतप्रधान मुळा-मुठा नदी प्रकल्पांचे पुनरुज्जीवन आणि प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभरणी

पंतप्रधान अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. मुळा-मुठा नदी प्रकल्पांचे पुनरुज्जीवन आणि प्रदूषण कमी करण्यासाठी ते पायाभरणीही यावेळी मोदी यांनी केली आहेत. 1080 कोटींहून अधिक खर्चाच्या प्रकल्पात नदीचा नऊ किलोमीटरचा भाग पुनरुज्जीवित केला जाईल, ज्यामध्ये नदीकाठचे संरक्षण, इंटरसेप्टर सीवेज नेटवर्क, सार्वजनिक सुविधा, नौकाविहार क्रियाकलाप इत्यादी कामांचा समावेश असेल. मुळा-मुठा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प "एक शहर एक ऑपरेटर" या संकल्पनेवर रु. 1470 कोटी खर्चून राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 400 एमएलडी क्षमतेचे एकूण 11 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधण्यात येणार आहेत.

पंतप्रधान 100 ई-बस आणि बाणेर येथे बांधलेल्या ई-बस डेपोचेही लोकार्पण यावेळी केले. पुण्यातील बालेवाडी येथे बांधण्यात आलेला पंतप्रधान आर.के लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाचे उद्घाटन केले आहेत. मालगुडी गावावर आधारित लघुचित्र मॉडेल हे संग्रहालयाचे मुख्य आकर्षण आहे, जे ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्सद्वारे जिवंत केले जाईल. व्यंगचित्रकार आरके लक्ष्मण यांनी काढलेली व्यंगचित्रे संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवाला सुरुवात करतील.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

सकाळी 11:30 वाजता पुणे (Pune) महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. ही मूर्ती 1850 किलो वजनाच्या बंदुकीच्या धातूपासून बनवण्यात आली असून ती सुमारे 9.5 फूट उंच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT