PM Modi in Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन आणि पुणे महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण हे त्यांच्या दौऱ्यातील मुख्य कार्यक्रम आहेत. यासह अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणीही ते आज पुण्यात (Pune) करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11.30 वाजता गरवारे मेट्रो स्टेशन प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे.
मेट्रो ट्रॅक 35 किमीचा आहे. मात्र सद्या किमीचे काम पूर्ण झाले आहे. पूर्ण झालेला टप्पा आनंदनगर ते गरवारे कॉलेज पर्यंतचा आहे.
यावेळेस राज्यपाल कोश्यारी, अजित पवार , देवेंद्र फडणवीस, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे , उदयनराजे भोसले, रामदास आठवले उपस्थित आहेत. राज्यपाल कोश्यारी, अजित पवार , देवेंद्र फडणवीस, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे , उदयनराजे भोसले, रामदास आठवले उपस्थित होते.
मोदींचा मेट्रो प्रवास
पंतप्रधानांनी मेट्रोचे तिकीट काढून प्रवास केला. गरवारे स्टेशनपासून कोथरूड पर्यंत मोदी मेट्रोने प्रवास करणार. मोदी मेट्रोचे स्वरून मेट्रो अधिकार्यांकडून मोदी समजून घेत आहेत. पुणे मेट्रोचा मोदी कडून आढावा घेण्यात आला यावएळी उपस्थितांनी मोदींच्या नावाचे नारे लावत गजर केला. मेट्रोच्या आत बसल्यानंतर त्यांनी दिव्यांग प्रवाशांशी संवाद साधला.
मेट्रो प्रकल्प
पुण्यातील नागरी चळवळीसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची पायाभरणीही 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) हस्ते करण्यात आली. एकूण 32.2 किमीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांबीचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते करण्यात आले आहेत. हा संपूर्ण प्रकल्प एकूण 11,400 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
सकाळी 11:30 वाजता पुणे महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. ही मूर्ती 1850 किलो वजनाच्या बंदुकीच्या धातूपासून बनवण्यात आली असून ती सुमारे 9.5 फूट उंच आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.