Nagpur Goa Shaktipeeth Expressway Tunnel Dainik Gomantak
महाराष्ट्र

Nagpur Goa Shaktipeeth Expressway: दीड तासाचे अंतर 20 मिनिटांत पूर्ण होणार; आजरा ते बांदा बनणार देशातील सर्वात लांब बोगदा

India’s Longest Tunnel: नागपूर ते गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाच्या चौथ्या टप्प्यात आंबोळीजवळ दोन लांब बोगदे तयार केले जाणार आहेत.

Pramod Yadav

Nagpur Goa Shaktipeeth Expressway

सिंधुदुर्ग: कोल्हापूर, सांगलीतील शेतकरी विरोध करत असले तरी शक्तिपीठ महामार्ग करण्याबाबत राज्य सरकार आग्रही आहे. शक्तिपीठ महामार्गाला सिंधुदुर्गमधून देखील विरोध होताना दिसत आहे. दरम्यान, या महार्गाबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. आजरा ते बांदा दरम्यान, देशातील सर्वात लांब बोगदा तयार केला जाणार असून, यामुळे हे अंतर केवळ २० मिनिटांत पार करता येणार आहे.

नागपूर ते गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाच्या चौथ्या टप्प्यात आंबोळीजवळ दोन लांब बोगदे तयार केले जाणार आहेत. या दोन्ही बोगद्यांची लांबी २९.९ किलोमीटर असेल, अशी माहिती समोर आली आहे. बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असेल, अशी माहिती समर आली आहे.

आजरा ते बांदा हे ३९ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सुमारे दीड तासांचा वेळ लागतो. बोगदा झाल्यानंतर हे अंतर केवळ २० मिनिटांत पार करता येणार आहे.

शक्तिपीठ सिंधुदुर्गच्या माथी मारण्याचा डाव

शक्तिपीठ सिंधुदुर्गच्या माथी मारण्याचा डाव असल्याचा आरोप सिंधुदुर्गातून केला जात आहे. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते जयेंद्र परुळेकर यांनी युती सरकारवर टीका केली होती. शक्तिपीठ महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होईल यामुळे पर्यावरणाची हानी होईल, असे परुळेकर म्हणाले होते. मागणी नसताना शक्तिपीठ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माथी का मारला जातोय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

नागपूर ते गोवा महामार्गाद्वारे महत्वाची देवस्थाने जोडून धार्मिक पर्यटनाला बढावा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली. परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोवा असा हा महामार्ग जाणार आहे. यात कारंजा लाड, माहूर, तुळजापूर, अंबाजोगाई, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, नांदेडचा गुरुद्वारा, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, औंदुबर, नृहसिंहवाडी, आदमापूर ही देवस्थाने जोडण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मायलेज'च्या भीतीपायी, एकजुटीला मूठमाती; सरकारला घेरण्याची रणनीती आखण्यावरून विरोधकांत एकमत नाही

PAN PAN PAN: 191 प्रवाशांना घेऊन गोव्याला निघालेल्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड येताच ओरडला पायलट, मुंबईत केलं इमर्जन्सी लँडिंग

Bengaluru Stampede: विराट कोहली जबाबदार...! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारनं सादर केला अहवाल, 'त्या' व्हिडिओचाही केला उल्लेख

Goa University Paper Leak:'कुंपणानेच शेत खाल्ले' समितीने म्हटलं, ते योग्यच; कुलगुरूंनी राजीनामा द्यावा

Goa Government Jobs: भरती प्रक्रियेत बदल! सरकारी नोकरीसाठी 'कॉम्प्युटर' टेस्ट'अनिवार्य; एजंटना 'नो एंट्री'

SCROLL FOR NEXT