Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ सिंधुदुर्गच्या माथी मारण्याचा डाव, ठाकरे सेनेच्या नेत्याचा हल्लाबोल

Nagpur-Goa Shaktipeeth Highway: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी मागणी केलेली नसताना शक्तिपीठ जिल्ह्याच्या माथी का मारला जात आहे? असा सवाल परुळेकरांनी उपस्थित केला.
Shaktipeeth project facing backlash in Sindhudurg
Nagpur-Goa Shaktipeeth ExpresswayDainik Gomantak
Published on
Updated on

Nagpur-Goa Shaktipeeth Expressway

सिंधुदुर्ग: नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरातील शेतकरी कडाडून विरोध करतायेत. दरम्यान, या महामार्गासाठी नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वेक्षण पार पडले. यावरुन जिल्ह्यातील नागरिक आणि राजकीय नेते आक्रमक झाले आहेत. शक्तिपीठ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माथी मारण्याचा युती सरकारचा डाव असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते आणि पर्यावरण प्रेमी जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.

शक्तिपीठ महामार्गासाठी नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वेक्षण पार पडले. सर्वेक्षणानंतर नीस उभारण्यात आले आहेत. महामार्गाचे सर्वेक्षण जनतेला गाफिल ठेवून करण्यात आल्याचा आरोप परुळेकरांनी केला आहे. महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होईल तसेच पर्यावरणाची हानी होईल, अशी भीती परुळेकरांनी व्यक्त केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी मागणी केलेली नसताना शक्तिपीठ जिल्ह्याच्या माथी का मारला जात आहे? असा सवाल परुळेकरांनी उपस्थित केला.

Shaktipeeth project facing backlash in Sindhudurg
Green Lungs Goa: राज्यातील शहरांना प्राणवायूचे 'बूस्ट', 'ग्रीन लंग्‍स' उपक्रमाला राज्यातील पालिकांचा पाठिंबा; वनमंत्री राणे यांची माहिती

सहापदरी रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होईल, यामुळे जंगली प्राण्यांचा त्रास अधिक वाढणार असून शेतकऱ्यांना त्याचा फटका बसेल, असेही परुळेकर म्हणाले. नागपूर ते गोवा या ८०० किलोमीटर लांबीचा महामार्गा १२ जिल्ह्यातून जाणार आहे. यासाठी हजारो एकर जमीन संपादीत होणार आहे. पण, मागणी नसताना महामार्ग का केला जात आहे? असा सवाल सर्वच बारा जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी करत आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अग्रस्थानी आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून देखील या महामार्गाला विरोध होत आहे.

नागपूर ते गोवा महामार्गाद्वारे महत्वाची देवस्थाने जोडून धार्मिक पर्यटनाला बढावा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली. परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोवा असा हा महामार्ग जाणार आहे. यात कारंजा लाड, माहूर, तुळजापूर, अंबाजोगाई, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, नांदेडचा गुरुद्वारा, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, औंदुबर, नृहसिंहवाडी, आदमापूर ही देवस्थाने जोडण्यात येणार आहेत.

Shaktipeeth project facing backlash in Sindhudurg
Goa Forest: गोव्यातील निम्म्या वनक्षेत्राला वणव्याचा धोका, केंद्रीय संशोधन संस्थेच्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाची घोषणा झाल्यापासून या महामार्गाला शेतकरी वर्गातून मोठा विरोध होत आहे. कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन करत या महामार्गाला विरोध दर्शवला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग केवळ पर्यटनाच्या दृष्टीकोनातून नव्हे तर दळणवळण आणि व्यापार या दृष्टीने देखील महत्वाचे असल्याचे नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नमूद केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com