Nagpur Goa Shaktipeeth Expressway: "86 हजार कोटींचा 'शक्तिपीठ' नको, कर्जमाफी द्या", सरकारविरोधात शेतकरी आक्रमक

Shaktipeeth Expressway: विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेली आश्वासनं केवळ दिखावूपणासाठी होती का? असा थेट सवाल कोल्हापूरातील संतप्त शेतकऱ्यांनी सत्ताधारी महायुती सरकारला केला आहे.
Nagpur Goa Shaktipeeth Expressway
Nagpur Goa Shaktipeeth ExpresswayDainik Gomantak
Published on
Updated on

Nagpur Goa Shaktipeeth Expressway

कोल्हापुर: विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेली आश्वासनं केवळ दिखावूपणासाठी होती का? असा थेट सवाल कोल्हापूरातील संतप्त शेतकऱ्यांनी सत्ताधारी महायुती सरकारला केला आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, अशी ग्वाही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारनं पलटी घेतल्याने शेतकरी आता आक्रमक झाले आहेत.

शेतकऱ्यांशी गद्दारी

कोल्हापूर सर्किट हाऊसमध्ये शुक्रवारी (०४ एप्रिल) शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक पार पडली. बैठकीमध्ये बोलताना समितीचे समन्वय गिरीश फोंडे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

गिरीश फोंडे बैठकीदरम्यान बोलताना म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे तसेच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करण्याचे आश्वासन वारंवार दिले होते. मात्र प्रत्यक्षात यातील एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही. आश्वासन देऊन देखील न पाळता शेतकऱ्यांशी गद्दारी करत असतील, तर शेतकरी तसेच सामान्य जनता हे सहन करणार नाही.

Nagpur Goa Shaktipeeth Expressway
Goa Police: गोवा पोलिस खात्यात 1140 पदे रिक्त! 42 उपअधीक्षक, 215 उपनिरीक्षक, 442 कॉन्स्टेबल्सचा समावेश

कुणाल कामराचं गाणं लावून विरोध

गेल्यावर्षी २९०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असताना देखील एकनाथ शिंदे विजय मेळावा घेत होते. हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. 12 मार्चला मुंबईत झालेल्या मोर्चाला देखील एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना भेटले नाहीत. त्यामुळे त्यांना आता कोल्हापुरात फिरकू देणार नाही. कुणाल कामराचं गाणं लावून शिंदेंचा विरोध केला जाईल, असं गिरीश फोंडे म्हणालेत.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध शेतकरी आंदोलनांना सरकार दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, "शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करण्याचा ठोस आदेश घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरात प्रवेश करावा. अन्यथा कोल्हापुरी जनता त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देईल."

Nagpur Goa Shaktipeeth Expressway
Abhay Deol: 'गोव्यातील सगळ्या गोष्टींनी मला खूप प्रेरणा दिली'! Goa Unseen अनावरणावेळी अभिनेता अभय देओलने व्यक्त केले प्रेम

कर्जमाफी द्या

निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना आश्वासने देणे आणि नंतर त्यांची पूर्तता न करणे, अधोगती दर्शवणारी गोष्ट आहे," अशी टीका गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांनी केली आहे.

राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना ८६ हजार कोटींचे कर्ज घेऊन 'शक्तिपीठ महामार्ग' उभारला जातोय. या पैशातूनच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी,असं प्रकाश पाटील बैठकीत बोलताना म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com