boats Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: रायगडमध्ये आढळल्या दोन संशयास्पद बोटी, शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ

Mumbai News: रायगडमध्ये एका मोठ्या कटाचा पर्दाफाश झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Mumbai News: रायगडमध्ये एका मोठ्या कटाचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांना परिसरातून संशयास्पद बोट सापडली आहे. बोटीतून एक एके-47 रायफल, जिवंत काडतुसे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रायगड परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जन्माष्टमीच्या एक दिवस अगोदर आणि गणेश चतुर्थीच्या काही दिवस आधी रायगडमध्ये संशयास्पद बोट सापडणे आणि बोटीतून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. रायगडच्या आमदार आदिती तटकरे म्हणाल्या की, 'रायगड परिसरात संशयास्पद बोट सापडणे नि:संशय चिंताजनक आहे. पोलीस आपल्या स्तरावर या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.'

दरम्यान, रायगडचे एसपी अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना (Police) हरिहरेश्वर समुद्रकिनारी एक संशयास्पद बोट सापडली आहे. बोटीची झडती घेतली असता, त्यातून एक रायफल, जिवंत काडतुसे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. मात्र ही बोट कुठून आली आणि रायगडमध्ये (Raigad) ही बोट कोणी आणली हे अद्याप समजू शकलेले नाही. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या सर्व प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

दुसरीकडे, 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असून लाखोंच्या संख्येने लोक गणेश विसर्जनासाठी रायगडच्या या भागात पोहोचतात, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत सर्व बाबी पाहता पोलिसांनी रायगड परिसरात हाय अलर्ट जारी केला आहे.

तपासासाठी विशेष पथक तयार केले

ही बाब अत्यंत गंभीर असल्याची माहिती रायगडच्या आमदार आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. हा मुद्दा मी विधानसभेतही मांडला होता, असेही आदिती यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालयचाही कार्यभार आहे. या प्रकरणी त्यांनी आपल्या स्तरावर चौकशीचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT