Couple Assault Viral Video Dainik Gomantak
महाराष्ट्र

Couple Assault Viral Video: फोटो काढणाऱ्या जोडप्याला अश्लील शेरेबाजी, बेदम मारहाण, 8 अल्पवयीन मुले ताब्यात; मुंबईतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

Mumbai Couple Assault Viral Video: मुंबईतील एका सार्वजनिक उद्यानात फोटो काढणाऱ्या जोडप्याला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

Manish Jadhav

Mumbai Couple Assault Viral Video: मुंबईतील एका सार्वजनिक उद्यानात फोटो काढणाऱ्या जोडप्याला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. कुर्ला परिसरातील फिनिक्स मॉलजवळ असलेल्या एका गार्डनमध्ये ही घटना घडली. तिथे फोटो काढत असलेल्या एका जोडप्याला आठ ते दहा मुलांच्या टोळक्याने आधी घाणेरड्या भाषेत टोमणे मारले आणि जेव्हा जोडप्याने याला विरोध केला, तेव्हा त्यांच्यावर थेट हल्ला चढवला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने पावले उचलत आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

उद्यानात उपस्थित असलेल्या इतर नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये (Mobile) कैद केला. या व्हायरल व्हिडिओमध्ये काही मुले जोडप्यावर काठीसारख्या वस्तूने हल्ला करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर या टोळक्याने जोडप्याचा पाठलाग करुन त्यांना पायऱ्यांवरुन खाली पळवून लावले आणि तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाणही केली. या घटनेनंतर घाबरलेल्या जोडप्याने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.

पोलिसांनी या टोळक्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला. यामध्ये बेकायदेशीर जमाव जमवणे, दुखापत होईल अशा वस्तूसह जमावात सामील होणे, मुद्दामहून मारहाण करुन इजा पोहोचवणे, शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान करणे आणि धमकी देणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

दरम्यान, या मारहाणीच्या घटनेवरुन आता राजकारणही तापू लागले आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हल्लेखोरांचा उल्लेख करत हा कट्टरतेचा प्रकार असल्याचा आरोप केला, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते इंतखाब फारुकी यांनीही या घटनेचा निषेध केला. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, तपासानंतरच यामागील नेमके सत्य समोर येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Agniveer Recruitment Data Leak: मोठी खळबळ! अग्निवीरांचा डेटा डार्क वेबवर विकायचा डाव? 14 वर्षांच्या मुलाला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात

Railways New Rules: प्रवाशांनो सावधान! ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात बोलणे पडू शकते महागात; न ऐकल्यास भोगावा लागू शकतो तुरुंगवास अन् दंड

Check Dam Construction: 3 तालुक्यांत 116 बंधाऱ्यांत पाणी अडवले; परिसरातील भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा

Gurpatwant Singh Pannun Murder Plot: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट, अमेरिकन कोर्टाचा निखिल गुप्ताला झटका; सुनावली 20 वर्षांची शिक्षा

Marigold Farming: काणकोणात झेंडूचा बहर; 1,060 क्विंटल उत्पादन, स्थानिक फुलांना ग्राहकांची पसंती

SCROLL FOR NEXT