

Grandmother Bullet Viral Video: सोशल मीडियावर सध्या हरियाणातील आजीबाईचा जबरदस्त व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आजीचा भन्नाट स्वॅगमध्ये पाहायला मिळत आहे. रॉयल एनफिल्ड बुलेट चालवतानाचा आजीचा खतरनाक अंदाज नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. गाडीवर पाठीमागे आजीबाईचा नातू हर्ष बसला असून, दोघेही रोडवर मनसोक्त राइडचा आनंद घेत आहेत.
दरम्यान, हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील '@harsh_dhaka139' या हँडलवरुन शेअर करण्यात आला. फिकट तपकिरी रंगाच्या बुलेटवर स्वार झालेली सुषमा आजी पारंपरिक वेशभूषेत आणि डोक्यावर स्कार्फ बांधलेली दिसते. मात्र, बुलेटवरील तिचा तोल आणि नियंत्रण पाहून ती वर्षानुवर्षे बुलेट चालवत असल्याचा भास होतो. मागे बसलेला सुषमा आजीचा नातू हर्षही हसतमुख दिसत असून, आजी रोडवर सहजपणे वळणे घेत भरधाव बुलेट चालवत आहे. कुठेही नवखेपणा न दिसता एका कसलेल्या रायडरचा थाट तिच्यात पाहायला मिळतो. हर्षने सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत तब्बल 2.29 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. ‘आजी समजून फ्लॉवर समजलात का, फायर आहे मी’, ‘आजीने तर मौजच केली’ अशा मजेशीर प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. वय हा केवळ एक आकडा असून मन तरुण असेल तर सर्व काही शक्य आहे, तसेच तरुणांनी यातून प्रेरणा घ्यावी, असेही अनेकांनी म्हटले. काहींनी सुरक्षेबाबत काळजी व्यक्त केली असली, तरी बहुतांश प्रतिक्रिया सकारात्मक आणि उत्साही आहेत. मर्यादित आयुष्य जगण्याचा सल्ला दिला जाणाऱ्या काळात सुषमा आजींनी जिद्द आणि आवड असेल तर वय आड येत नाही, हे दाखवून देत सर्वांची मने जिंकली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.