Narayan Rane Dainik Gomantak
महाराष्ट्र

नारायण राणेंना दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाने दिला 'हा' निर्णय

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज (March 22, Tuesday) मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. बीएमसीने नारायण राणे (Narayan Rane) यांना पाठवलेल्या नोटीसवर सध्या कोणतीही कारवाई करु नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत.

मुंबईतील जुहूमधील अधीश बंगल्याच्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी मुंबई महापालिकेने (BMC) नारायण राणे यांना तिसऱ्यांदा नोटीस पाठवली आहे. त्यास 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला होता. त्यांना नोटीस पाठवून एकतर या पंधरा दिवसांत बेकायदा बांधकाम पाडावे अन्यथा बीएमसी ते पाडून टाकेल, असे सांगण्यात आले होते. जर बीएमसीने तो बंगला पाडला तर त्याचा खर्च नारायण राणे यांच्याकडूनच वसूल केला जाईल, असेही त्यांना सांगण्यात आले होते. यानंतर नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नारायण राणे यांच्या बंगल्याशी संबंधित नोटीसवर तूर्तास कोणतीही कारवाई करु नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज बीएमसीला दिले आहेत.

दरम्यान, नारायण राणे यांनी न्यायालयाला सांगितले की, बंगल्यासंबंधी पाठवण्यात आलेली नोटीस बेकायदेशीर आहे. बीएमसीच्या नोटीसीमुळे माझ्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले आहे. कोर्टाने दिलेल्या या दिलासानंतर नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, ''मुंबईत सर्व काही ठीक आहे का? रस्ते चांगले आहेत का ? चोवीस तास पाणी येत आहे? मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या फोनवर वारंवार कोणत्यातरी नेत्याचे फोन यायचे आणि राणेंच्या घरावर तात्काळ कारवाई करण्याचे त्यांना सांगितले जात. बीएमसी आणि शिवसेनेकडे एवढेच काम उरले आहे. राणेंच्या घरात काय चाललयं? किरीट सोमय्या कोणासोबत चहा घेत आहेत? मोहित कंबोजने कोणता शर्ट घातला आहे? BMC चे संपूर्ण लक्ष या 2-3 लोकांवर आहे.''

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्याच्या बांधकामावर कोणी प्रश्न का उपस्थित करत नाही?

नितेश राणे पुढे म्हणाले, ''राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात जो कोणी बोलेल त्याच्यावर हे सरकार कारवाई करते. आज मातोश्री (Chief Minister's private bungalow) बंगल्यात ध्वनीरोधक भिंत तयार करण्यात आली आहे. मातोश्रीमध्ये अनेक अनधिकृत बांधकामे झाली आहेत. ते नंतर नियमित करण्यात आली आहेत. यावर कोणी का बोलत नाही? ठाकरे सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे.''

शिवाय, नारायण राणे यांच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी बीएमसीने नोटीस पाठवली असता नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्रीमध्ये झालेल्या बेकायदा बांधकामाबाबतचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणार असल्याचे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT