शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आणि अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) त्यांच्याविरुद्ध तपास सुरू केला तेव्हा ते भाजपमध्ये होते, असाही दावा केला त्यांनी यावेळी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी काँग्रेस पक्षात असताना राणेंवर केलेल्या आरोपांचे काय झाले, हे शिवसेनेचे लोकसभा सदस्य विनायक राऊत यांनाही जाणून घ्यायचे आहे असे ते म्हणाले.
विनायक राऊत म्हणाले की, "सोमय्या यांनी राणेंवर भ्रष्टाचार आणि बेहिशेबी संपत्तीचे अनेक गंभीर आरोप केले आहेत, त्यानंतर ईडीने काही शेल कंपन्यांची चौकशी केली त्यामुळे राणे घाबरले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मला आशा आहे की सोमय्या त्यांच्याकडे असलेले पुरावे पुन्हा ईडीला देतील आणि अधिकारी त्यांच्यावर कारवाई करतील. यावर ईडीचे उत्तर आम्हाला नक्कीच एकायला आवडेल.
राणे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली आणि शिवसेना-भाजप सत्तेत असताना 1995-99 या काळात ते एका वर्षापेक्षा कमी काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि मंत्री (Minister) झाले.
काही वर्षांनंतरच राणेंनी काँग्रेस (Congress) सोडून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली.
2018 मध्ये रानेंनी आपला पक्ष भाजपमध्ये (BJP) विलीन केला.
2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते राज्यसभा सदस्य झाले. त्यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून घोषित करण्यात आले.
विनायक राऊत यांच्या या विधानाच्या एक दिवस आधी शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही भाजपचे काही नेते आणि व्यापारी भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.