Mumbai Goa highway will be closed for 7 hours Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक 7 तासासाठी बंद

आज मुंबई-गोवा (Mumbai-Goa) हायवे सात तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. राजधानी एक्स्प्रेसच्या (Rajdhani Express) इंजिनचं चाक रुळावरुन घसरल्याने, कोकण रेल्वेची (Konkan Railway) वाहतूक ठप्प झाली आहे.

Dainik Gomantak

रत्नागिरी : तुम्ही मुंबईहून गोव्याला (Goa) आणि गोव्याहून मुंबईला (Mumbai) जायचा विचार करतांय तर आधी तुम्ही ज्या मार्गाने जाणार आहात त्या मार्गाबद्दल विशेष माहिती जाणून घ्या. आज मुंबई-गोवा हायवे सात तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाशिष्टी नदीच्या पूल बांधकामासाठी सात तास या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.

चिपळूणमध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीवर चालू असलेल्या पूल बांधकामासाठी सात तास बंद ठेवल्याने वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. सध्या दोन्ही बाजूंनी 2 ते 3 किमीपर्यंतच्या वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत.

दरम्यान राजधानी एक्स्प्रेसच्या इंजिनचं चाक रुळावरुन घसरल्याने, कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. कोकण रेल्वेच्या भोके ते उक्षी मार्गावर बोल्डर रूळावर पडल्याने राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनचं एक चाक रूळावरून घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक थांबली आहे. ही घटना आज पहाटे सव्वा चारच्या सुमारास घडली. हजरत निजामुद्दीन ते मडगाव या मार्गे ही ट्रेन धावत होती. या घटनेची माहिती मिळताच कोकण रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी तात्काळ रवाना झाली आहे आणि इंजिन पुन्हा मार्गावर आणण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरून जाणाऱ्या विविध गाड्या मार्गावरील स्थानकात थांबिवण्यात आल्या आहेत. सुदैवाने या घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही.

दरम्यान, या आपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान रत्नागिरी स्थानकात कोचीवली एक्सप्रेस, भोके येथे सीएसटीएम कडे जाणारी एक्सप्रेस, चिपळूणला नागकोईल एक्सप्रेस, दिवा सावंतवाडी एक्स्प्रेस खेडला तर मंगला एक्सप्रेस वैभवावाडीला थांबवून ठेवण्यात आली आहे. या मार्गांवर अजून काही तास वाहतूक ठप्प राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT