चंद्रपुर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअरभागात सफारी करण्यास परवानगी

चंद्रपुर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा (Tadoba Andhari National Park) कोअर झोन नियम आणि अटींसह पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.
Tadoba Andhari National Park
Tadoba Andhari National ParkDainik Gomantak
Published on
Updated on

चंद्रपूर: लॉकडाउनमुळे (Lockdown) सगळेच लोक घरात बसून कंटाळले आहे. मात्र शासन आणि प्रशासनाला मदत करत आपली काळजी घेणही गरजेचं आहे. मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी होतांना दिसत असतांना काही गोष्टींवरील निर्बंध सरकार हळूहळू उठवत आहेत. यातच चंद्रपुर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन (Tadoba Andhari National Park) नियम आणि अटींसह पर्यटकांसाठी (Tourism) खुले करण्यात आले आहेत. कोरोनाव्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून सर्वच पर्यटन स्थळं बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. आता तब्बल तीन महिन्यांनंतर पर्यटन स्थळं पुन्हा सुरु होत असल्याने व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे.

क्षमतेनुसार पर्यटकांच्या गाड्यांना प्रवेश

ताडोबा व्यवस्थापनाने या संदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्रात 15 एप्रिल 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रूग्णसंख्येचा वाढता प्रसार टाळण्यासाठी कडक लॉकडाउन लावण्यात आला होता. राज्य शासनाच्या आदेशानुसार 4 जूनला पर्यटनासंबंधी गतिविधी राबविण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने या आदेशाद्वारे 30 जून पर्यंत कोअरभागात सफारी सूरू करण्यची परवानगी दिली आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या 6 प्रवेशद्वारातून दिवसाच्या 2 टप्प्यात ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार पर्यटकांच्या गाड्यांना अनुमती दिली जाणार आहे.

Tadoba Andhari National Park
अनलॉक करण्याची घाई नको; 7 जिल्ह्यांना जास्त काळजी घेण्याची गरज

1 जुलै पासून पर्यटन सुरू

प्रवेशद्वारावर जाऊन पर्यंटकांना सफारीसाठी बुकिंग करावी लागणार आहे. नियमाप्रमाणे 1 जुलै पासून पावसाळ्यात ताडोबा कोअर क्षेत्र 4 महिन्यांसाठी बंद असणार मात्र बफर मध्ये 1 जुलै पासून पर्यटन सुरू राहण्याची शक्यता आहे. ताडोबा वाघ्र प्रकल्प पर्यटन क्षेत्र सुरू करण्यासाठी रिसॉर्ट-हॉटेल आणि व्यावसायिक-जिप्सी ऑपरेटर्सचा मोठा दबाव होता बफर क्षेत्रातील सफारी सुरू करण्यासाठी नियमांनुसार स्वतंत्र आदेश काढणअयात येणार आहे. कोरनाच्या त्रिसुत्री नियमांच पालन होण गरजेच आहे. पर्यटकांना मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक करण्यात आले आहे आणि कोविडची लक्षणं आढळल्यास पर्यटकाला प्रवेश नाकारणार येणार आहे.

Tadoba Andhari National Park
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील , कुडाळ तालुक्यातील 27 गावांचा संपर्क तुटला

बफर क्षेत्रात 115 वाघ आणि 151 बिबटे

ऐन पर्यटन हंगामात ताडोबा व्याघ्र प्रकल्प साडेतीन महिन्यांपासून बंद असल्याने पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या हजारो लोकांचा रोजगार बुडाला होता. जवळपास तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान या लोकांच झालं आहे. रोजगार बुडाल्याने त्यांच्यावर उपासमारीचीही वेळ आली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी ओळखला जातो. महाराष्ट्रात व्याघ्र प्रेमींची पर्यटनासाठीची पहिली पसंती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला दिली जाते. महाराष्ट्र वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थेने संयुक्तपणे जाहीर केलेल्या अहवालानुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात 115 वाघ आणि 151 बिबटे असल्याचा प्राथमिक अंदाज या अहवालातव्यक्त करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com