Mumbai Cruise Case: Sameer Wankhede met BJP leader Mohit Kamboj says Nawab Malik
Mumbai Cruise Case: Sameer Wankhede met BJP leader Mohit Kamboj says Nawab Malik Dainik Gomantak
महाराष्ट्र

समीर वानखेडे -भाजप नेत्यांमध्ये भेट? नवाब मलिक करणार खुलासा

दैनिक गोमन्तक

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानशी (Aryan Khan) संबंधित मुंबई क्रूज पार्टी (Mumbai Cruise Case) प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत . मलिकने क्रूझवर छापा टाकण्यासाठी एनसीबीची (NCB) संपूर्ण कारवाई बोगस असल्याचे सांगितले होते . आणि आता नवाब मलिक यांनी NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर नवा आरोप केला आहे.(Mumbai Cruise Case: Sameer Wankhede met BJP leader Mohit Kamboj says Nawab Malik)

एनसीबीने क्रूझवर कारवाई करून 11 जणांना ताब्यात घेतले होते. यापैकी 3 जणांना दोन तासांच्या चौकशीनंतर सोडण्यात आले. रीषभ सचदेवा हे देखील सुटका झालेल्यांपैकी एक होता. आणि तो भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांचे नातेवाईक होते, त्यामुळे त्यांना भाजपच्या दबावाखाली सोडण्यात आले.असा आरोप देखील मालिकांनी NCB वर केला होता. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत हा आरोप केला होता. मोहित कंबोज यांनी हा आरोप फेटाळून लावत नवाब मलिक यांच्याविरुद्ध 100 कोटींच्या बदनामीच्या खटल्याचा इशारा दिला होता. मोहित कंबोज यांनी ही नोटीस नवाब मलिक यांना पाठवली आहे. दरम्यान,मात्र नवाब मलिक यांनी सोमवारी पुन्हा एक नवा आरोप केला आहे.

नवाब मलिक म्हणाले, “मुंबई क्रूझ पार्टी प्रकरणात मोहित कंबोज यांनी काय केले ते मी समोर आणीनच . 7 ऑक्टोबर रोजी कंबोज आणि समीर वानखेडे कुठे भेटले हे मला माहित आहे. मी एक -दोन दिवसात त्याचा व्हिडिओ रिलीज करणार आहे. केवळ ही कारवाईच नाही, रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर देखील अनेक सेलिब्रिटींना ड्रग्स प्रकरणात सतत गोवण्यात आले होते. मी त्या सर्व प्रकरणांचा पर्दाफाश करेन

बॉलिवूड आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे मोठे षड्यंत्र रचण्यात आले आहे. या सर्व बाबींच्या मागे भाजप आहे. या सर्व क्रिया एका अधिकाऱ्याच्या मदतीने पार पडल्या आहेत. येत्या काळात मी त्यांच्याविषयीचे अनेक व्हिडिओ मीडियासमोर आणणार आहे.असे देखील नवाब मालिकांनी सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

Taliban: तेलाच्या खेळात तालिबान आजमावतोय हात; ‘या’ दोन देशांसोबत बनवली खास योजना!

Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

SCROLL FOR NEXT