Rain  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Monsoon update: पुन्हा एकदा या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

पश्चिम महाराष्ट्र सोडून उर्वरित भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस (Rain)होण्याची शक्यता. पावसाच्या कमी अधिक प्रमाणामुळे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात (temperature)बदल होताना दिसून येत आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र: गेल्या आठवड्या मध्ये पूर्व विदर्भ, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाड्यात मुसळधार पाऊस (Heavy rain)झाला होता. तर इतर राज्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. राज्यात सध्या हलका ते मध्यम पाऊस सुरु असून, आता 25 ते 30 सप्टेंबर या कालावधीत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात सरासरीपेक्षा अधिक, तर पश्चिम महाराष्ट्रात सरीसरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याकडून (weather Department)वर्तवण्यात आला आहे.

ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी विश्रान्ती घटली होती, त्यांनतर या सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीपासून राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाने धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. यामुळे धरणातून (Dam)पाण्याचा सोडण्यात आले. पूर्व आणि मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे आलेला मॉन्सून यामुळे गेल्याच आठवड्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात अनेक ठिकाणी मोठा प्रमाणात पाऊस झाला.

विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मराठावाड्यातील औरंगाबाद, जालना, कोकणातील पालघर, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात पाऊस झाला. रत्नागिरी, नाशिक, नंदूरबार, वाशीम, परभणी या जिल्ह्यात सरासरी पर्यंत पाऊस झाला.

तसेच, पुढील आठवड्यात 1 ते 7 ऑक्टोबर या काळातही राज्यात मुसळधार पावसाचे अंदाज आहेत. या काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे असे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहे.

पावसाच्या कमी अधिक प्रमाणामुळे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात (temperature) बदल होताना दिसून येत आहे. पुढील आठवड्यात राज्यात कमाल तापमान 28 ते 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 ते 26 अंश असण्याची शक्यता आहे. तसेच पुढील आठवड्यात कमाल तापमानाचा पारा 28 ते 32 अंश, तर किमान तापमान 20 ते 24 अंशादरम्यान राहू शकते असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

SCROLL FOR NEXT