आठवड्याच्या सुरवातीपासूनच राज्यात पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढली आहे (Maharashtra Rain). हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार पावसाचा हा जोर आणखी वाढेल. पावसाच्या संदर्भात पुढील 48 तास अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत कारण या 2 दिवसात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे (Heavy Rain). आणि याचमुळे लोकांना आवश्यकतेनुसारच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.(Monsoon Update: Heavy Rain in Mumbai & Vidarbh, IMD declare yellow alert in many district)
काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या आसपास तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुढील 48 तासांमध्ये कमी होईल. यामुळे 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, कोकण, विदर्भात मुसळधार
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पालघर, माथेरान, रायगड, ठाणे, मुंबई येथे मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. या जिल्ह्यांमध्ये सर्वत्र ढग आहेत. तर पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्याच्या अनेक जिल्ह्यांत येल्लो अलर्ट
राज्यात अहमदनगर, औरंगाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, अकोला, परभणी आणि नांदेड जिल्हे वगळता सर्वत्र येल्लो अलर्ट जरी करण्यात आला आहे.विदर्भातही अमरावती, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याने लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
त्याचबरोबर यावेळी परतीच्या पावसाचा फरक वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना पूर्ण वेळ मिळेल. गेल्या काही वर्षांपासून परतीचा पाऊस रखडला आहे, यामुळे शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. हवामान खात्याने पाऊस उशिरा परतण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.