Goa Politics: 'सरदेसाईंनी 24 तासांत माफी मागावी अन्यथा कारवाई'! सभापतींचा इशारा; 5 जणांच्या संकुल प्रवेशावर घातली बंदी

Goa Assembly: विधानसभेत फलक फडकवल्याप्रकरणी आमदार विजय सरदेसाई हे जबाबदार असल्याचा निष्कर्ष सभापती गणेश गावकर यांनी प्राथमिक चौकशी अंती काढला आहे.
Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विधानसभेत सहा मार्च रोजी प्रेक्षागृहातील चार जणांनी घोषणा देत फलक फडकवल्याप्रकरणी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई हे जबाबदार असल्याचा निष्कर्ष सभापती गणेश गावकर यांनी प्राथमिक चौकशी अंती काढला आहे. सरदेसाई यांनी सभागृहाच्या अवमान प्रकरणी २४ तासांत विनाअट माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सभापतींनी दिला आहे.

विधानसभेत सोमवारी अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान सभापतींनी हे निवेदन केले. सभापतींनी नमूद केले की, ६ मार्च रोजी विधानसभेच्या प्रेक्षागृहात‌ घोषणाबाजी व‌ फलक फडकावण्याची घटना ही सभागृहाचा अवमान करणारी होती.

यामुळे सभासदांच्या विशेषाधिकाराचा संकोच झाला आहे. सरदेसाई हे मीराबाग विषयावरून विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडत असताना चौघांनी घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी या विषयावर मी निवेदन करेन, असे सांगितले होते. ते निवेदन आता करत असल्याचे सभापतीनी स्पष्ट केले.

त्यांच्यावर संकुल प्रवेशावर बंदी

आपा नाईक, उमेश नाईक, उपेंद्र नाईक आणि हेमंत भंडारी यांच्यासह सरदेसाई यांच्या कार्यालयातील कर्मचारी ऋत्‍विक मांद्रेकर यांच्या विधानसभा संकुल प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी सरदेसाई यांनी २४ तासांत विनाअट माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सभापती याविषयी निवेदन करत असताना सरदेसाई विधानसभेत होते. सभापतींनी अर्थसंकल्पीय चर्चेसाठी निलेश काब्राल यांचे नाव पुकारले आणि काब्राल बोलण्यासाठी उठले तेव्हा सरदेसाई निघून‌ गेले.

दरम्यान, याप्रकरणी एका माजी आमदाराचाही हात आहे आणि त्या संदर्भातील चौकशी सुरू आहे. सभागृहाच्या प्रेक्षागृहात घोषणा दिल्यानंतर त्यांना विधानसभेच्या मार्शल करवी बाहेर काढण्याची कारवाई केल्यानंतर त्यांनी बाहेर आनंदोत्सव साजरा केल्याचेही समाज माध्यमांवरील पोस्टवरून दिसून येते. त्यांची ही कृती घटनाबाह्य तर आहेत या शिवाय ती लोकशाहीचा पाया कमकुवत करणारी आहे. यासाठी त्यांच्या या कृतीची गंभीर दखल घेण्यात आली आहे असे सभापतींनी नमूद केले.

Vijai Sardesai
Mirabag: 'आंदोलनकर्त्यांचा संयम सुटू लागलाय'! LOP आलेमाव यांचा इशारा; मुख्‍यमंत्र्यांना केले भेट देण्याचे आवाहन

दीपक पाऊसकरांची ४ तास चौकशी

सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीत केलेल्या निदर्शन प्रकरणी माजी मंत्री दीपक पाऊसकर यांना सोमवारी पर्वरी पोलिस स्थानकात चार तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर पाऊसकर म्हणाले, मिराबागच्या जनतेचा या बंधाऱ्याला २ वर्षांपासून विरोध आहे. जनतेच्या या न्याय्य मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठीच विधानसभेचा मार्ग निवडला होता. मात्र, आंदोलक घोषणा देतील, याची पूर्वकल्पना आम्हाला नव्हती.

Vijai Sardesai
Mirabag: आंदोलनस्थळीच महिलादिन साजरा! मीराबागमध्ये महिलांनी कापला केक; आगळेवेगळे सेलिब्रेशन चर्चेत

सरदेसाईंकडूनच शिफारस

सभापती गावकर म्हणाले, चार जणांना विधानसभा कामकाज पाहण्यासाठी आवश्यक तो परवानगी देण्यासाठी सरदेसाई यांनीच शिफारस केली होती. त्यांच्या हालचालीविषयी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ते सरदेसाईंच्या कार्यालयात आणि संकुल परिसरात संशयास्पदरीत्या वावरताना दिसले. विधानसभेच्या प्रेक्षागृहात परवानगी देण्यासाठी सरदेसाई यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यानेही मदत केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com