Mobile app give Idea of running away and 13 year old boy reached at Goa Dainik Gomanatak
महाराष्ट्र

मोबाईल अ‍ॅपने सांगितली पळून जायची आयडिया, 13 वर्षाचा मुलाने गाठला गोवा

सुरुवातीला घरच्यांना वाटलं की तो मस्करी करतोय.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून एक 13 वर्षीय बालक मुंबईहून गोव्यात पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे राहणाऱ्या १३ वर्षीय मुलाने मोबाईल अ‍ॅपवरील चुकीच्या चर्चेला बळी पडून घरातून पळ काढला आणि गोवा गाठला. काहीतरी वेगळं करण्याच्या इराद्याने तो घराबाहेर पडला होता, मात्र त्याच्या मोबाईलमधील अ‍ॅपमुळे हे सर्व घडलं.

या प्रकरणी बदलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच ठाणे सायबर सेलच्या मदतीने पोलिसांच्या विशेष पथकाने अखेर या मुलाला गोव्यातून परत आणून बदलापूर येथील त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. या सर्व प्रकारामुळे काही मोबाईल अ‍ॅप्स अल्पवयीन मुलांसाठी धोकादायक असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

बदलापूरमधील 13 वर्षांचा मुलगा 31 ऑक्टोबर रोजी ‘डिस्कॉर्ड’ अ‍ॅपवरील गटचर्चेचा बळी ठरल्यानंतर थेट गोव्यात गेला होता. वर्षभरानंतर घरी परतणार असल्याचे सांगून मुलगा घराबाहेर पडला होता.

कुटुंबियांना हा विनोद वाटला

सुरुवातीला घरच्यांना वाटलं की तो मस्करी करतोय. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने पालकांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली.

तपासादरम्यान पोलिसांना ‘डिस्कॉर्ड’ या ऑनलाइन वेबसाइटची माहिती मिळाली. या वेबसाईटवर 'रनअवे अँड गेट अ लाइफ' नावाचा ग्रुप सापडला. गटात घरातून पळून गेल्याची चर्चा होती. घरातून पळून जाण्याचे अनेक बेत होते. या चर्चेला बळी पडून हा मुलगा गोव्यात पळून गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कळंगुटमध्ये सापडला मुलगा

पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे मुलाचा शोध सुरू केला असता हा मुलगा गोव्यातील कळंगुट या ठिकाणी असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी गोव्यात जाऊन मुलाला ताब्यात घेतले.

यामध्ये गोवा पोलीस, ठाणे सायबर सेलने बदलापूर पोलिसांना मदत केली. सुरुवातीला पोलिसांना वाटले की मुलाचे कोणीतरी अपहरण केले आहे, मात्र थेट गोव्यातून 13 वर्षांचा मुलगा सापडल्याने पोलिसांनाही आश्चर्य वाटले. बदलापूर पोलिसांनी या मुलाला गोव्यातून ताब्यात घेऊन त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.

दरम्यान, मोबाईल अ‍ॅपचा बळी होऊन गोव्यात गेलेल्या मुलाने आपली चूक मान्य करत इतर मुलांनी या मोबाईल ऍपला बळी पडू नये आणि अशी परिस्थिती उद्भवल्यास कुटुंबीय व पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cooch Behar Trophy: 'अव्वल'साठी गोवा मैदानात, कुचबिहार क्रिकेट स्पर्धेत चंडीगडविरुद्ध लढत

गोव्यात पोट भरणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणावर प्राणघातक हल्ला; झारखंडच्या संशयिताला पणजीत अटक

Goa Today News Live: सर्वत्र खंडणी, भ्रष्टाचार! गोव्यातील आणखी एका भाजप नेत्याचा सरकारवर आरोप; केजरीवालांनी शेअर केला व्हिडिओ

Bicholim: डिचोली तालुक्यात भाजी, मिरची लागवडीची लगबग; दीडशेहून अधिक हेक्टर क्षेत्रात उत्पादन शक्य

Mapusa: म्हापशातील कोमुनिदाद प्रशासक इमारत कमकुवत, शासनाकडून दखल नाही; कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका

SCROLL FOR NEXT