Dr. Pramod Sawant X Handle
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीला महाराष्ट्र पुन्हा संधी देईल, कोल्हापूर येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला विश्वास

Goa CM Dr. Pramod Sawant In Kolhapur: चंदगड, कोल्हापूर येथे जय जवान, जय किसान महा मेळाव्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबोधित केले.

Pramod Yadav

कोल्हापूर: 'जवान, शेतकरी, महिला आणि युवा अशा सर्वाना समर्पित असे महायुतीचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा महायुतीला राज्याची सेवा करण्याची संधी देईल याची मला खात्री वाटते', असे वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी (१३ ऑक्टोबर) केले.

चंदगड, कोल्हापूर येथे जय जवान, जय किसान महा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबोधित केले.

'केंद्र सरकारने पीएम किसान, फसल बीमा, कृषि सिंचाई सारख्या योजना राबवल्या आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरु केली आहे त्यामुळे शेतकर्‍यांना लाभ मिळत आहे.'

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि गोव्याचे सुपुत्र मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्री असताना निवृत्त जवान आणि कुटुंबिय यांच्यासाठी महत्वपूर्ण अशा One Rank, One Pension चा निर्णय घेण्यात आला', असे मुख्यमंत्री सावंत यावेळी बोलताना म्हणाले.

या कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्य सभा खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, भाजप कोल्हापूर विधानसभा संयोजक शिवाजी पाटील, आजी-माजी सैनिक आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

'जय जवान, जय किसान हा नारा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जय विज्ञान, जय अनुसंधान असा पुढे नेण्यात येत आहे', असे सावंत म्हणाले.

'जवान, शेतकरी, महिला आणि युवा अशा सर्वाना समर्पित असे महायुतीचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा महायुतीला राज्याची सेवा करण्याची संधी देईल याची मला खात्री वाटते', असा विश्वासही सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT