Candolim Crime: गोव्यात चाललंय काय? कांदोळी बीचवर काढली छेड, जाब विचारताच महिलेला बेदम मारहाण; परप्रांतीयांना अटक

Goa Crime News: डॉ. राहुल चौधरी आणि डॉ. नरेंद्र सिंग हे जनावरांचे डॉक्‍टर आहेत. आपली ड्युटी संपवून ते कांदोळी किनाऱ्यावर फिरायला आले होते.
Candolim Crime: गोव्यात चाललंय काय? कांदोळी बीचवर महिलेसह दोन डॉक्‍टरांवर प्राणघातक हल्ला, रक्तबंबाळ होईपर्यंत मारहण
Goa Latest Crime NewsCanva
Published on: 
Updated on: 

Goa Candolim Beach Tourist Doctors Assault Crime

कळंगुट: कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर एका महिलेसह दोन पर्यटक डॉक्‍टरांवर प्राणघातक हल्ला करण्‍याची खळबळजनक घटना घडली आहे. पार्वती जोशी, डॉ. राहुल चौधरी आणि डॉ. नरेंद्र सिंग अशी त्‍यांची नावे आहेत. दरम्‍यान, या प्रकरणी आत्तापर्यंत तिघांना अटक करण्‍यात आली आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. काही युवकांनी त्‍या महिलेची छेड काढली आणि त्‍या दोन डॉक्‍टरनी विरोध करताच दहा ते पंधरा जणांच्‍या टोळक्‍याने दंडुक्‍यांच्‍या साहाय्‍याने तिघांवरही हल्ला चढविला. त्‍यात तिघांचेही कपडे रक्ताने माखून गेले होते.

या प्रकरणी कळंगुट पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी लागलीच तपास करून जितेंद्र सिंग (२४), भूपेंद्र सिंग (२४, दोघेही रा. उत्तराखंड) व अरुण कुमार (२५, उत्तरप्रदेश) यांना अटक केली आहे. कळंगुटचे पोलिस निरीक्षक परेश नाईक पुढील तपास करत आहेत.

Candolim Crime: गोव्यात चाललंय काय? कांदोळी बीचवर महिलेसह दोन डॉक्‍टरांवर प्राणघातक हल्ला, रक्तबंबाळ होईपर्यंत मारहण
Assonora Crime: गोव्यात अंमलीपदार्थविरोधी पथकाचा धडाका! अस्नोड्यात तिघांच्या मुसक्या आवळल्या; आठवड्यातील चौथी कारवाई

महिलेची छेड काढल्‍याने वाद

डॉ. राहुल चौधरी आणि डॉ. नरेंद्र सिंग हे जनावरांचे डॉक्‍टर आहेत. आपली ड्युटी संपवून ते कांदोळी किनाऱ्यावर फिरायला आले होते. तेथील एका शॅक्सवर त्‍यांनी जेवण घेतले. त्‍यातील ती महिला पाय मोकळे करण्‍यासाठी बाहेर आली असता अज्ञात टोळक्‍याने तिची छेड काढली. यावेळी त्‍यांच्‍यात बाचाबाची झाली. त्या महिलेसोबत असलेल्या अन्‍य दोन डॉक्‍टरांनी धाव घेत मध्यस्थी करण्‍याचा प्रयत्‍न केला असता त्‍या टोळक्‍याने हल्ला चढविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

eighth accused arrested in Porvorim shooting case
Porvorim Firing Case Latest Update
Galjibaga Beach Erosion Goa
Goa Beach Shack 20 Lakh Fine
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com