Maharashtra trembled Five die after drinking sanitizer
Maharashtra trembled Five die after drinking sanitizer 
महाराष्ट्र

महाराष्ट्र हादरला! पाच जणांचा सॅनिटाइझर प्यायल्याने मृत्यू

गोमंतक वृत्तसेवा

यवतमाळ: राज्यात कोरोनाचा संसर्ग (CoronaVirus) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा वेगाने प्रसार होत असून राज्य सरकारने संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन (Lockdown) लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात दारु विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. यातूनच यवतमाळमधून (Yvatmal) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारुची तलफ झाल्यानंतर काही महाभागांनी दारु ऐवजी सॅनिटायझरचं प्यायले. (Maharashtra trembled Five die after drinking sanitizer)

महाराष्ट्रमधील (Maharashtra) यवतमाळ जिल्ह्यातील वणी (Wani) या गावी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दारुचं व्यसन जडलेल्या काही जणांनी दारुची तलफ भागवण्यासाठी सॅनिटायझर (Sanitizer) प्यायले. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे दारुची दुकाने बंद आहेत. त्यामुळे त्यांनी सॅनिटायझरच प्यायले, अशी माहिती पिडीत कुटुंबियांतील नातेवाईकांनी दिली आहे. या घटनेतील इतर तिघांची प्रकृती अत्यवस्थ असून, मृत व्यक्तींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दत्ता लांजेकर, नूतन पाथरटकर, गणेश नांदेकर, संतोष मेहर, सुनील ढेंगळे अशी पाच मृत व्यक्तींची नावे आहेत.

राज्यात विदर्भातील यवतमाळ, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. याच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं डबल म्युटेशन आढळून आलं. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडाही प्रचंड प्रमाणात वाढला. त्यानंतर राज्यभरात कोरोना विषाणूचं संक्रमण झालं. या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात अखेर राज्य शासनाला लॉकडाऊन जाहीर करावा लागला. तर अनेक जिल्ह्यांमध्ये दारु विक्रीवरही बंदी घालण्यात आली. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यातील विपुल शिपयार्ड कंपनीवर ईडीचा छापा, 12.20 कोटींची मालमत्ता जप्त

Goa Indore Flight: खराब हवामानाचा फटका! एक तास हवेत घिरट्या घालत होतं विमान; प्रवाशांचा जीव टांगणीला

वेंगुर्लेतील खाडीत बुडालेल्या दोन तरुणांपैकी एकाला वाचवण्यात यश; शोधकार्य सुरु

Lairai jatra: लईराई देवीच्या जत्रोत्सवादरम्यान तरुणीकडून वादग्रस्त पोस्ट; भाविकांची पोलिस ठाण्यावर धडक

Goa Today's Live News: मांडवीखाडी वेंगुर्ला येथे म्हापशातील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT