CM Uddhav Thackeray and Governor Bhagat Singh Koshyari Assembly speaker

 

Dainik Gomantak 

महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्ष निवडीवरून महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल आमने-सामने

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मतदान प्रक्रियेतील बदल घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील विधानसभा अध्यक्षांच्या (Assembly speaker) निवडीवरून महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल यांच्यात खडाजंगी झाली आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सभापती निवडीचा प्रस्ताव फेटाळला. महाराष्ट्र सरकारने नियम समितीच्या माध्यमातून सभापतींच्या निवडणुका घेण्याच्या पद्धतीत बदल केला होता.

महाराष्ट्राचे (Maharashtra) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मतदान प्रक्रियेतील बदल घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. सभापती आणि उपसभापतींच्या निवडणुकीसाठी वेगळी पद्धत असू शकत नाही, असे राज्यपालांनी पत्राद्वारे सांगितले आहे. राज्य सरकारने गुप्त मतदानाचे आवाजी मतदानात रूपांतर केले होते. या बदलाला घटनाबाह्य ठरवल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशी स्वीकारणे राज्यपालांना बंधनकारक असल्याचे सांगत राज्यपालांवर निशाणा साधला.

काँग्रेसचे (Congress) नाना पटोले (Nana Patole) हे विधानसभेचे पहिले सभापती होते. त्यांनी या पदाचा राजीनामा देऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रकृती अस्वास्थ्यानंतर त्यावेळी अन्य कोणालातरी मुख्यमंत्री केले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अटकळांना पूर्णविराम दिला. उद्धव ठाकरे बरे होत असून त्यांची जागा कोणी घेणार नाही, असे ते म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT