जर तुम्ही नवीन वर्षाची (New Year) सुरुवात शिर्डीच्या साईबाबांच्या आशीर्वादाने करू पाहत असाल आणि शिर्डीला जाण्याचा विचार करत असाल किंवा विठ्ठलाचा आशीर्वाद घेण्यासाठी पंढरपूरला जाण्याचा विचार करत असाल, तर बाहेर जाण्यापुर्वी हि माहिती जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. कोणत्याही तिर्थक्षेत्राला जाण्यापुर्वी तेथिल नवीन नियम आणि वेळापत्रक जाणून घ्या.
ओमिक्रॉन (Omicron) आणि कोरोनाचा (Covid-19) वाढता धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) रात्रीचा कर्फ्यू (Night Curfew) लागू केला आहे. हा कर्फ्यू रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत लागू राहणार आहे. राज्य सरकारचा हा आदेश लक्षात घेऊन शिर्डीचे साईबाबा मंदिरही रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत भाविकांसाठी बंद राहणार आहे. यामुळे तुम्ही रात्री आणि पहाटेच्या आरतीला उपस्थित राहू शकणार नाही. श्री साईबाबा संस्थान (Sai baba Shirdi) शिर्डी यांनी हा निर्णय घेतला आहे.
पंढरपूर मंदिर प्रशासनाने रात्रीच्या विठ्ठलाच्या दर्शनाची सुविधा बंद केली
शिर्डीच्या साई संस्थानपाठोपाठ आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराशी संबंधित प्रशासनानेही दर्शनाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. आता येथेही रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत विष्णू अवतार विठोबाचे दर्शन घेण्यास बंदी असणार आहे. मंदिर प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पंढरपूर मंदिर (Pandharpur Temple) प्रशासनानेही राज्य सरकारने लागू केलेल्या कर्फ्यू चे नियम लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.
रात्री 9 वाजल्यापासून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद
आता नव्या वेळापत्रकानुसार या दोन्ही मंदिरांचे दरवाजे रात्री 9 वाजल्यापासून भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे दर्शनासाठी रात्री नऊच्या आधी पोहोचावे लागते. राज्यात नाताळ आणि नववर्षाच्या सुट्या सुरू झाल्या आहेत. अशा स्थितीत या मंदिरांमध्ये (Temple) भाविकांची मोठी गर्दी होत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी गर्दी कमी होईल आणि दर्शनाला कोणतीही अडचण येणार नाही, या आशेने अनेक भाविकांना रात्री किंवा पहाटे मंदिरात जावेसे वाटते. तसेच त्यांना सकाळच्या आरतीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. मात्र मंदिर प्रशासनाच्या या निर्णयामुळे भाविकांची निराशा झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.