Ahmednagar Hospital Fire Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: सिव्हिल हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रातील (Maharashtra) अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलच्या (Ahmednagar Hospital Fire) आयसीयूमध्ये शनिवारी सकाळी आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलच्या (Ahmednagar Hospital Fire) आयसीयूमध्ये शनिवारी सकाळी आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. आयसीयूमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी तात्काळ हलवण्यात आले आहे. त्याचबरोबर मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या वॉर्डमध्ये आग लागली तो कोविड वॉर्ड होता. सध्या अग्निशमन विभागाकडून आग आटोक्यात आणण्यात आली आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. साडेअकराच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली.

अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयातील कोविड वॉर्डात तात्काळ हलवण्यात आले आहे. रुग्णालयाच्या इमारतीचे 'फायर ऑडिट' करण्यात आले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या प्राथमिक तपासात स्पष्ट होत असल्याचे भोसले यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

SCROLL FOR NEXT