मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच, एसटी-कारमध्ये झालेल्या धडकेत 3 ठार

पेण तालुक्यातील जिते गावाच्या हद्दीत एसटी (ST) आणि कारमध्ये (Car) झालेल्या अपघातात (Accident) 3 ठार आणि 2 गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
Mumbai-Goa Highway महामार्गावर शुक्रवारी रात्री पेण तालुक्यातील जिते गावाच्या हद्दीत एसटी (ST) आणि कारमध्ये (Car) अपघात
Mumbai-Goa Highway महामार्गावर शुक्रवारी रात्री पेण तालुक्यातील जिते गावाच्या हद्दीत एसटी (ST) आणि कारमध्ये (Car) अपघात Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) अपघाताचे (Accident) सत्र काही केल्या थांबण्याचे चित्र दिसत नाही. या महामार्गावर शुक्रवारी रात्री पेण तालुक्यातील जिते गावाच्या हद्दीत एसटी (ST) आणि कारमध्ये (Car) झालेल्या अपघातात 3 ठार आणि 2 गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

Mumbai-Goa Highway महामार्गावर शुक्रवारी रात्री पेण तालुक्यातील जिते गावाच्या हद्दीत एसटी (ST) आणि कारमध्ये (Car) अपघात
मुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरण, न्यायालयाची राज्य सरकारला तंबी

जखमींना तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात नक्की कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाली होती.

Mumbai-Goa Highway महामार्गावर शुक्रवारी रात्री पेण तालुक्यातील जिते गावाच्या हद्दीत एसटी (ST) आणि कारमध्ये (Car) अपघात
मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा येथील उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच होणार सुरुवात

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्ग हा दिवसेंदिवस वाढत्या अपघातामुळे मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांना एका जनहित याचिकेनंतर मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरण प्रकल्पाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. कामाच्या ठिकाणी अयोग्य बॅरिकेडिंगमुळे घडणार्‍या अपघातांमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास उशीर झाल्यामुळे जीवितहानी होत असल्याचा दावा दाखल करण्यात आला होता. तसेच पावसाळ्यामुळे निर्माण झालेले खड्डे भरून वाहनांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देशही हायकोर्टाने अधिकाऱ्यांना दिले होते. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका असलेल्या या महामार्गावर दररोज प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच रस्त्याच्या रुंदीकरणाच्या प्रकल्पातील विलंब तसेच इतर समस्यांचे निराकरण करण्यासाठी 2018 मध्ये दाखल करण्यात आली आहे. यावर हायकोर्टाने NHAI आणि राज्यांना महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे निर्देश दिले असले तरी, आतापर्यंत याचे काम करण्यात आलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com