Maharashtra Crime News Dainik Gomantak
महाराष्ट्र

वर्ध्यात खटल्याच्या सुनावणीदरम्यान महिला वकिलावर चाकूने हल्ला

न्यायालय परिसरात खळबळ; आरोपीला अटक

दैनिक गोमन्तक

Maharashtra Crime News: महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान एका महिला वकिलावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (Woman lawyer stabbed during trial in Wardha

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भीम गोविंद पाटील याच्यावर कलम 307 अंतर्गत खटला सुरू आहे. 22 मार्च रोजी वकील योगिता या न्यायालयात साक्षीदाराचे म्हणणे नोंदवून घेत असताना भीम गोविंदने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने (Attack) न्यायालयात उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी (Police) आरोपी भीम गोविंदला तत्काळ ताब्यात घेतले.

या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच एलसीबीचे पथक न्यायालयात पोहोचले. जखमी महिला वकिलाला उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी भीम पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. कडेकोट बंदोबस्त असतानाही आरोपी चाकू घेऊन न्यायालयात कसा पोहोचला, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT