खुशखबर ! IPL 2022 ची तिकीट विक्री सुरू; जाणून घ्या तिकीटांचा दर

IPL तिकिटांची विक्री 23 मार्चपासून म्हणजेच आजपासून दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झाली आहे.
IPL 2022 Tickets Sale Start
IPL 2022 Tickets Sale StartDainik Gomantak

IPL 2022 Tickets Sale Starts : 2022च्या हंगामातील इंडियन प्रीमियर लीग (IPL) 26 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना शनिवारी संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. मेगा टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयने (BCCI) आयपीएल सामन्यांसाठी तिकीट विक्री सुरू केली आहे.

यावेळी आयपीएलचे सर्व 70 सामने मुंबईतील तीन आणि पुण्यातील एकाच स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. कोरोनामुळे यावेळी 25 टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. कोरोनाच्या काळात आयपीएलमध्ये (IPL) चाहत्यांच्या प्रवेशावर बंदी होती, ती आता हटवण्यात आली आहे. (IPL 2022 Tickets Sale Starts)

IPL 2022 Tickets Sale Start
'आयपीएल'मध्ये टीम इंडियाला भावी कर्णधार मिळू शकतो: रवी शास्त्री

IPL तिकिटांची विक्री 23 मार्चपासून म्हणजेच आजपासून दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झाली आहे. प्रेक्षक आयपीएलच्या अधिकृत वेबसाइट www.iplt20.com वर तिकीट खरेदी करू शकतात. याशिवाय www.BookMyShow.com वरही तिकिटे उपलब्ध असणार आहेत. यामध्ये 2500, 3000, 3500 आणि 4000 रुपयांची तिकिटे उपलब्ध आहेत. पहिल्या सामन्याशिवाय इतर सामने आणि स्टेडियम्सबद्दल बोलायचे झाले तर, आयपीएल सामन्यांची विक्री 800 रुपयांपासून सुरू आहे आणि तिकीटे 4000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

मुंबईतील वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर 20-20 सामने होणार आहेत. याशिवाय सीसीआय स्टेडियमवर 15 सामने, पुण्यातील एमसीए स्टेडियमवर 15 सामने होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com