rashmi thackeray.jpg 
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल 

दैनिक गोमंतक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. 23 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्या घरीच क्वारंटाईनमध्ये होत्या. क्वारंटाईनमध्ये असताना त्यांना अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 11 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांनी कोरोनाची लस घेतली होती. सध्या रश्मी ठाकरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा मुलगा आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.  (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray's wife  admitted to hospital) 

मंत्री आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर दोघांनाही घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते. परंतु मंगळवारी रश्मी ठाकरे यांची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र राज्यसरकारमधील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जायनात पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्यासह अनेक नेते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. 

तथापि, महाराष्ट्रात एकूण 27,918  नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर  मंगळवारी मुंबईत 4760 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात 139 लोक मरण पावले. त्याचवेळी, 23,820 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या महाराष्ट्रात 3,40,542 सक्रिय रूग्ण आहेत. या व्यतिरिक्त, 16,56,697 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 17,649 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. 

तथापि, मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी बीकेसी जंबो कोविड सेंटरमध्ये मंगळवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची तयारी करण्याची घोषणा केली होती, पण मुंबईत तातडीने लॉकडाऊन लागू करण्याची सध्या तरी कोणतीही योजना नाही. पुढील 15 दिवस मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतरच लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. 

तसेच, राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी लक्षात घेता राज्य सरकारने पुढील पंधरा दिवसांसाठी काही निर्बंध घातले आहेत, परंतु हे लॉकडाऊन नाही. लोकांनी काटेकोरपणे त्याचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. मात्र कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली तर ठीक नाहीतर नाईलजास्तव  लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल. मुंबईतील रूग्णांची संख्या वाढली आहे. हे पाहता रुग्णांच्या उपचाराची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयात बेड, आयसीयू, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची कमतरता नाही.  असेही त्यांनी सांगितले. 
 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT