Konkan Railway Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोरोना नियमात शिथिलता आणा अन्यथा.. ठाकरे सरकारला इशारा

आरटीपीसीआर चाचणी अहवाल किंवा कोरोना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र बाळगण्याच्या अटीबद्दल कोकण प्रवासी संघाने विरोध दर्शविला आहे.

दैनिक गोमन्तक

कोकणात (Konkan) गणेशत्सव साजरा करण्यासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गामध्ये राज्य ससरकारने कोरोना (Covid 19) नियमांच्या अटी आणि नियमांचे विघ्न आणल्याने गणेशभक्तांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावर कोकण रेल्वे प्रवासी संघाने सरकारच्या नियमांचा निषेध केला आहे. आरटीपीसीआर चाचणी अहवाल किंवा कोरोना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र बाळगण्याच्या अटीबद्दल कोकण प्रवासी संघाने विरोध दर्शविला आहे. येत्या 5 सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारने (State Government) गणेशभक्तांना कोरोना नियमात मुभा न दिल्यास 6 सप्टेंबरला रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा कोकण रेल्वे प्रवासी संघाने यावेळी दिला आहे.

कोकण रेल्वे प्रवासी संघाचा विरोध?

कोकणामध्ये गणेशत्सव साजरा करणे हा चाकरमान्यांसाठी विशेष पर्वणीचा सोहळा असतो. या पाश्वभूमीवर यंदा कोकणामध्ये जाण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. मागील वर्षापासून कोरोनामुळे कोकणवासीयांना घरी जाता आलेले नाही. आता मात्र कोरोनाचा संसर्ग काहीसा ओसरु लागल्याने अनेकांनी तीन महिने आगोदरच रेल्वेचे आरक्षण केले होते. त्यामुळे यंदा कोकणामध्ये गणेशत्सव साजरा करण्यासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना जाता येणार आहे. पंरतु पुन्हा महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने ठाकरे सरकारने 23 ऑगस्ट रोजी नवीन अटी आणि नियम लागू केले आहेत. आणि त्याच कोरोना नियमांना कोकण प्रवासी संघाने विरोध दर्शवला आहे.

राज्य सरकारने नव्या नियमांमध्ये काय म्हटलंय?

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना नव्या नियमांनुसार आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र त्याचबरोबर कोरोना लसीचे दोन डोस घेतले असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता गणेशत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा हिरमुड झाला आहे. दरम्यान चाकरमान्यांच्या मार्गातील अडथळे त्वरित दूर करण्यात यावेत यासाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर येत्या 5 सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारने कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता न आणल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT