Konkan Railway: मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा बिघडले

मुंबई गोवा महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या विभागातील रेल्वे (konkan railway) सेवा तात्पुरत्या वेळेसाठी स्थगित करण्यात आल्या आहेत.
Konkan Railway
Konkan RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा एकदा बिघडले. कोकण रेल्वेच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या असून काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत . गोव्या दोन दिसवापासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे (heavy rain) रत्नागिरी विभागातील चिपळूण (ratnagiri) आणि कामठे स्थानकांदरम्यान भागात पावसाने झोडपून काढले आहे. 130 किमीवर असेलल्या वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेविचार करता या विभागातील रेल्वे (konkan railway update) सेवा तात्पुरत्या वेळेसाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. परिस्थितीचा आढावा बघता एन.डी.आर.एफला (NDRF) कोल्हापुरात पाचारण करण्यात आले आहे. ही दोन्ही पथके पुण्याहून कोल्हापूरला रवाना झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. (Railway services in the Konkan region have been temporarily suspended)

कोणत्या स्थानकात कोणती रेल्वे किती वाजल्यापासून...

1) 02617 up at SGR from 07:36 hrs

2) 01134 up at KMAH from 05:17 hrs

3) 01003 dn at CHI from 06:14 HRS

4) 04695 dn at RN from 07:17 Hrs.

5) 06346 up at VID from 08:06 Hrs.

6) 06001 dn at MAO from 08:41 Hrs.

7) 01151 dn at DWV from 08:50 Hrs.

8) 06072 up at RAJP from 08:24 Hrs.

Konkan Railway
Monsoon Update: कसारा घाटात दरड कोसळल्याने, रेल्वे आणि रस्ते वाहतूक बंद

दरम्यान राज्यातील बहुतांश भागांना या दोन दिवसाच्या पावसाचा फटका बसला आहे. सातारा, कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांतील पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे अनेक ठिकाणच्या पूलांवरील वाहतुकही ठप्प झाली आहे.

सिंधुदुर्गात पावसाचा जोर आज पहाटेपासून आहे. जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पाऊस वाढू लागला आहे. कुडाळ, कणकवली, मालवण, वैभववाडी या भागामध्ये पावसाची संततधार सकाळपासून सुरूच आहे. या भागातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. समुद्रलाही मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे. त्यामुळे किनारपट्टी लगत राहाणाऱ्या नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Konkan Railway
Kolhapur:पंचगंगेचे पात्र पुन्हा ओव्हर फ्लो, लोकांना सावधानतेचा इशारा

या भागातली वाहतूक बंद

  • रत्नागिरीतील बावनदी पुल वाहतुकीसाठी बंद

  • लांजा अंजणारी पुलावरील वाहतूक बंद

  • रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका

  • भुईबावडा घाटातील अवजड वाहतूक आजपासून बंद

  • चिपळूणचा बाहाद्दूर शेख पुल वाहतुकीसाठी बंद

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com