Konkan Railway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Konkan Railway: कोकण रेल्वेचा फुकट्यांना दणका; विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 17.83 कोटी दंड वसूल

Konkan Railway Fines Ticketless Passengers: कोकण रेल्वेने तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली असून विना तिकीट प्रवाशांविरोधात कडक कारवाईचे धोरण अवलंबले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: कोकण रेल्वेने तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली असून विना तिकीट प्रवाशांविरोधात कडक कारवाईचे धोरण अवलंबले आहे. कोकण रेल्वेने सुरक्षित व जबाबदार प्रवासावर लक्ष केंद्रित केले आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील तिकीट तपासणी मोहिमेची वारंवारता वाढवली आहे. त्याचा परिणाम म्हणून नोव्हेंबर महिन्यात १०७० विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या व ४२,९६५ अनधिकृत व अनियमित प्रवाशांकडून भाडे व दंड म्हणून एकूण २.३३ कोटी वसूल केले.

जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्याच्या कालावधीत ७,४८३ विशेष मोहिमा राबविल्या व २,९०,७८६ विना तिकीट प्रवाशांकडून रेल्वे भाडे व दंड म्हणून एकूण १७.८३ कोटी रुपये वसूल करण्यात आले.

मोहीम आणखी तीव्र होणार

कोकण रेल्वेने नोव्हेंबर महिन्यात १०७० विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. त्यात ४२,९६५ अनधिकृत व अनियमित प्रवासी आढळू्न आले. त्यांच्याकडून भाडे व दंड म्हणून एकूण २.३३ कोटी वसूल करण्यात आले.

कोकण रेल्वेने सर्व प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वी वैध तिकिटे खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. योग्य तिकिटाशिवाय प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्व अधिकृत प्रवाशांच्या सुरक्षित, सुरळीत व आरामदायी प्रवासासाठी आगामी हिवाळा व नाताळ सणाच्या हंगामात संपूर्ण मार्गावर तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र करणार, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT