Goa Theft: नवेवाडेतील चॅपेलमध्ये चोरी, संशयित अटकेत; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तासाभरात आवळल्या मुसक्या

St Anthony Chapel Vasco Theft: नवे वाडे येथील सेंट अँथनी चॅपेलातील मूर्तीची मोडतोड केल्याप्रकरणी तसेच तेथील फंडपेटीतील रक्कम चोरल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी नवनीत सिंग (३०) याला बुधवारी अटक केली.
St Anthony Chapel Vasco Theft
St Anthony Chapel Vasco TheftDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: नवे वाडे येथील सेंट अँथनी चॅपेलातील मूर्तीची मोडतोड केल्याप्रकरणी तसेच तेथील फंडपेटीतील रक्कम चोरल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी नवनीत सिंग (३०) याला बुधवारी अटक केली. तक्रार झाल्यावर अवघ्या तासभरात सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला अटक केल्याने तेथील शांतता भंग झाली नाही.

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे संशयिताने मध्यरात्री हे कृत्य करताना अंगावर फक्त अंडरवेअर व बनियान घातली होती. यामागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही. तथापि त्याला काही मानसिक विकृती आहे काय याचा शोध वास्को पोलिस घेत आहेत.

सेंट अँथनी चॅपेलीताली मूर्तीची तोडमोड झाल्याचे तसेच फंडपेटीतील रक्कम नाहीशी झाल्याचे बुधवारी सकाळी त्या चॅपेलामध्ये आलेल्या एका व्यक्तीला दिसून आले. त्याने ही माहिती इतरांना देताच तेथे मोठ्या संख्येने लोक जमा झाले. स्थानिक नगरसेवक सुदेश भोसले व नवे वाडे येथील नगरसेवक विनोद किनळेकर हेही घटनास्थळी आले.

St Anthony Chapel Vasco Theft
Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंना झटका; अंतरिम जामीन नाकारला, दिल्लीच्या राेहिणी न्यायालयाचा निर्णय

याबाबत माहिती मिळताच पोलिस त्वरित घटनास्थळी आले. त्यांनी तपासकामाला करताना तेथील सीसीटिव्ही तपासले असता एक व्यक्ती चॅपेलात जाताना दिसून आले. ती व्यक्ती मोबाईलवर बोलत एका दुमजली इमारतीच्या पायऱ्या चढत असल्याचे दुसऱ्या सीसीटिव्हीमध्ये दिसून आले. चौकशीनंतर ती व्यक्ती संशयित नवनीत सिंग असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

St Anthony Chapel Vasco Theft
Goa Nightclub Fire: प्रसंगी आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांवरही होईल कारवाई, क्‍लबमधील आगीनंतर कडक पावले

मंगळवारी सेंट अँथोनी चॅपेलात भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाला आले होते. त्यानंतर मध्यरात्री संशयिताने त्या चॅपेलात प्रवेश करून तेथील मूर्तीची तोडफोड केली व फंडपेटी फोडली. यामागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

संशयित विवाहित असून काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या पत्नीला व मुलांना गावी पाठविले होते. सध्या तो मित्रासह नवेवाडे येथील खोलीत राहत होता. तो चॅपेलामध्ये शिरण्यापूर्वी तेथील एक दोन घराभोवती घुटमळत होता, असे सीसीटीव्हीत आढळून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com