Nivrutti Maharaj Deshmukh Indurikar Dainik Gomantak
महाराष्ट्र

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या स्कॉर्पिओला जालन्यात अपघात

सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या गाडीचा अपघात झाला.

दैनिक गोमन्तक

सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर (Nivrutti Maharaj Deshmukh Indurikar) यांच्या गाडीचा अपघात झाला. किर्तनासाठी जात असताना जालना जिल्ह्यातील परतूर येथे रात्री 10 च्या सुमारास त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाला असून चालक किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Kirtankar Nivrutti Maharaj Indurikar Scorpio Accident at Jalna)

इंदरोकर महाराजांना कुठलिही इजा झाली असून ते सुरक्षित असल्याचेही म्हटले जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून किर्तनासाठी जात असताना परतूर येथे एका वळणावर त्यांच्या स्कार्पिओ गाडीची लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक लागली. एमएच 12 टीवाय 1744 या क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने इंदोरीकर प्रवास करत होते.

परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर रस्ता क्रॉस करताना हा अपघात झाला आहे. दरम्यान, जखमी चालक संजय गायकवाड यांना पोलिसांच्या मदतीने शहरातील अस्थिरोग तज्ञांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शामसुंदर शामसुंदर कौठाळे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT