खासदार नवनीत राणा यांना का देण्यात आली वाय प्लस दर्जाची सुरक्षा?

अमरावतीसह देशभरात कुठेही वास्तव्यास असताना खासदार नवनीत राणा यांच्याभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
Navneet Rana
Navneet RanaDainik Gomantak
Published on
Updated on

अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने Y+ श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे. यामध्ये आता खासदार नवनीत राणा यांचा व्हीव्हीआयपी म्हणजेच अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींच्या श्रेणीत समावेश करण्यात आला असून, अमरावतीसह देशभरात कुठेही वास्तव्यास असताना खासदार नवनीत राणा यांच्याभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Navneet Rana
INS Vikrant Case: 'विक्रांत' मध्ये एका दमडीचा घोटाळा केला नाही'

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने पुरवलेल्या या सुरक्षा व्यवस्थेमध्ये एसपीओ आणि एनएसजी कमांडो, सीएसएफचे बंदूकधारी, सरकारी पायलट कार आणि दोन स्कॉर्पिओच्या ताफ्याचा समावेश आहे. तसेच या सर्व बंदोबस्तासह हा सुरक्षा ताफा खासदार नवनीत राणा यांच्यासह चोवीस तास तैनात राहणार आहे. विशेष म्हणजे खासदार नवनीत राणा नेहमी लोकसभेत महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आवाज उठवतात.

Navneet Rana
Aryan Khan Case: NCB ने मुख्य तपास अधिकारी अन् गुप्तचर अधिकाऱ्याला केलं सस्पेंड

त्याचबरोबर देशातील अनेक गंभीर बाबींवरही त्या बोलत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर विभागाने गृह मंत्रालयाला दिला होता. याची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खासदार नवनीत राणा यांना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांचा वाय प्लस सुरक्षा ट्रॅक कालच अमरावतीमध्ये पोहोचला. ज्यामध्ये एकूण 11 कमांडोचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com