नागपुरातून सिल्व्हर ओक आंदोलनचा मास्टरमाइंड मुंबई पोलिसांच्या ताब्यात

सिल्व्हर ओक हल्ल्याचा मास्टरमाइंड हा नागपूरचा आहे आणि लवकरच त्याचे नाव समोर येणार असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं होते.
Sharad Pawar
Sharad PawarDainik Gomantak
Published on
Updated on

आझाद मैदानावर (Azad Maidan) आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी (ST staff) काही दिवसांपूर्वी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक बंगल्याबाहेर आंदोलन केले. (Mumbai Police arrests mastermind of Silver Oak Movement)

Sharad Pawar
खासदार नवनीत राणा यांना का देण्यात आली वाय प्लस दर्जाची सुरक्षा?

यावेळी आंदोलकांनी घराबाहेर दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून आरोप-प्रत्यारोप होताना आपल्याला दिसत आहेत. शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनाची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या पथकाने नागपुरातून (Nagpur) आणखी एकाला ताब्यात घेतले असल्याचे म्हटले जात आहे.

पोलीस सूत्रांनी सांगितले आहे की, संदीप गोडबोले हा नागपुरातील गणेशपेठ आगर येथे कार्यरत एसटी कर्मचारी आहे. पोलिसांचे पथक त्याला मुंबईमध्ये आणत आहेत तर त्याची चौकशी केली जाणार आहे. वकील प्रदीप घरत यांनी आज न्यायालयात नागपुरचा व्यक्ती सदवार्ते यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. ती व्यक्ती हीच का? याचा पोलीस आता तापस करणार आहेत. गोडबोले आरोपी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या संपर्कात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. सिल्व्हर ओक हल्ल्याचा मास्टरमाइंड हा नागपूरचा आहे आणि लवकरच त्याचे नाव समोर येणार असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं होते.

Sharad Pawar
Aryan Khan Case: NCB ने मुख्य तपास अधिकारी अन् गुप्तचर अधिकाऱ्याला केलं सस्पेंड

नागपूरच्या काही व्यक्तींसोबत व्हॉट्सअॅप कॉल

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनामागे षडयंत्र असल्याचा युक्तीवाद काल सरकारी वकीलांनी केला आहे. या आंदोलनाआधी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची नागपूरच्या एका व्यक्ती सोबत चर्चा झाल्याचं त्यांच्या चॅटमधून स्पष्ट झालं आहे अशी माहितीही सरकारच्या वतीनं न्यायालयात देण्यात आली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या संदर्भात नागपूरच्या एका व्यक्तीसोबत बोलणं केल्याचं पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झालं. तर 7 एप्रिल 2022 ला रात्री 11 ते 2.50 पर्यंत सदावर्तेंच्या टेरेसवर एक मिटींग झाली त्यावेळी या मिटींगमध्ये नागपूरची व्यक्ती देखील सहभागी झाली होती. अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी हे आंदोलनाअगोदर त्या नागपूरच्या व्यक्तीला समोरासमोर भेटल्याचे देखील वकिलांनी युक्तीवादात म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com